25 September 2020

News Flash

ओम पुरी यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज

सतीश कौशिक यांनी ओम पुरींच्या अर्ध्या भागाच्या डबिंगचे काम पूर्ण केले आहे.

ओम पुरी

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ओम पुरी यांनी ६ जानेवारी रोजी शेवटचा श्वास घेतला. या दिग्गज अभिनेत्याच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कोणत्याच अभिनेत्याला शक्य नाही. त्यांची उपस्थिती आता फक्त त्यांच्या कामाच्या माध्यमातून जीवंत राहिली आहे. ते असे एक रत्न होते, जे आता फक्त सिनेमाघरांत जाऊन पाहता येईल. त्यांचा शेवटचा चित्रपट असलेला ‘मि. कबाडी’ येत्या ८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होईल.

वाचा : किकूची सूचक किक!, राम रहिम सिंगला शिक्षा दिल्यावर ‘एमएसजी’रहित चायनीजचा आस्वाद…

ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूर यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला ‘मि. कबाडी’ एक व्यंगपूर्ण कॉमेडी आहे. जेव्हा ‘कबाडीवाला’ श्रीमंत होतो तेव्हा तो कसा आपल्या पैशाचा देखावा करतो आणि अन्य करोडपती सारखा राहतो. तसेच, तो कशाप्रकारे आपल्या उद्योगाचा विस्तार करतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलेय.

वाचा : अक्षयचा ‘हा’ चित्रपट असेल २०१८ मधील सर्वात मोठा ‘ब्लॉकबस्टर’

ओम पुरींव्यतिरीक्त अन्नू कपूर, विनय पाठक, सारिका, सतीश कौशिक, बिजेंद्र काला, कशिश वोरा, उल्का गुप्ता, राजवीर सिंग यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटासाठी सतीश कौशिक यांनी ओम पुरींच्या अर्ध्या भागाच्या डबिंगचे काम पूर्ण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 12:13 pm

Web Title: late om puris last film mr kabaadi to release on 8 september
Next Stories
1 बाबा राम रहिमला शिक्षा सुनावल्यानंतर शाहरुखने व्यक्त केला आनंद
2 ‘पद्मावती’साठी रणवीर, शाहिदपेक्षाही दीपिकाला अधिक मानधन
3 अक्षयचा ‘हा’ चित्रपट असेल २०१८ मधील सर्वात मोठा ‘ब्लॉकबस्टर’
Just Now!
X