News Flash

‘लाफ्टर डे’च्या निमित्ताने झी टॉकीजवर होणार हास्यस्फोट

२ मे रोजी पूर्ण दिवस सुपरहिट कॉमेडी चित्रपटांची मेजवानी

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसं त्यांच्या कामामध्ये प्रचंड गुरफटून गेली आहेत. त्यामुळे कुठे तरी त्यांचं हास्य हरवत चाललं आहे. त्यातच आता संपूर्ण जगात थैमान घातलेल्या ‘कोरोना’मुळे चिंतेत अधिक भर घातली आहे. या साऱ्याचा परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. हे सारं टाळायचं असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्व समजून देण्यासाठी जगभरामध्ये हास्य दिन साजरा केला जातो.

हास्य दिनानिमित्त झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही सुपरहिट विनोदी चित्रपट सादर करणार आहे. रविवार २ मे रोजी सकाळी ९ वाजल्या पासून झी टॉकीजवर विनोदी चित्रपटांची आतिषबाजी होणार आहे.

सकाळी ९ वाजता विनोदवीर मकरंद अनासपुरे याचा गाढवाचं लग्न तर दुपारी १२ वाजता तमाम प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला सदाबहार चित्रपट अशी ही बनवाबनवी प्रेक्षकांच्या भेटीस येईल. दुपारी ३ वाजता विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांचा पहिली शेर, दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर हा चित्रपट तर संध्याकाळी ६ वाजता विनोद या शब्दाला जगणारे अभिनेते दादा कोंडके यांचा सुपरहिट चित्रपट पळवापळवी प्रसारित होईल. रात्री ९ वाजता भाऊचा धक्का हा खास विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 5:25 pm

Web Title: laughter day special movie avb 95
Next Stories
1 Video: “पोटभर खाणं हेच माझं डाएट”
2 ‘बॅकवॉटर्स’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 “लस कुठे उपलब्ध आहे ते सांगा?”; ‘त्या’ सेलिब्रिटींना निया शर्माचा सवाल
Just Now!
X