19 September 2020

News Flash

Video : प्रेमाची अनुभूती देणारं ‘बॉईज २’ मधील रोमॅंटीक गाणं प्रदर्शित

शेष म्हणजे हे गाणं लेह लडाखमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘बॉईज २’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘तोडफोड’ हे आयटम साँग प्रदर्शित झालं. या गाण्याने तरुणाईचं चांगलंच मनोरंजन केलं असून पुन्हा एकदा तरुणाईला वेड लावणारं नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.

कॉलेज जीवन अनुभवताना त्यात होणारं पहिलं प्रेम, मुलांच भावविश्व दाखविणारं ‘शोना’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर हे गाणं प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या पसंतीत दिसत आहे. विशेष म्हणजे हे गाणं लेह लडाखमध्ये चित्रीत करण्यात आलं आहे.

सुप्रसिद्ध प्रेमगीतकार मंदार चोळकर लिखित या गाण्याला, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा आवाज लाभला आहे. निसर्गाच्या कुशीत आणि बोचऱ्या थंडीत प्रेमाची हळूवार पालवी फुलवणारं हे गाणं सुमंत शिंदे आणि सायली पाटील या नवोदित जोडीवर चित्रित करण्यात आले आहे. प्रेमीजोडप्यांना आकर्षित करणाऱ्या या गाण्यातील विहंगम दृश्य रसिकांचे मन मोहून टाकतात.

पडद्यावर सुंदररित्या साकार झालेल्या या गाण्यासाठी चित्रपटाच्या टीमला प्रचंड मेहनत घ्यावी लागली असून अनेक प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. लेह-लडाखमध्ये थंडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे अनेकांच्या नाकातून रक्त आल्याचं पाहायला मिळालं. तर काही कलाकारांना ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून श्वास घ्यावा लागला.

दरम्यान, तीन मित्रांची रंजक दुनिया दाखवणाऱ्या, या सुपरहिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार? याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली असून, मोठ्या पडद्यावरील ‘बॉईज’ च्या या पुनरागमनला सिनेचाहते भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशादेखील व्यक्त होत आहे.‘बॉईज’ चा हा सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 10:05 am

Web Title: launches boys 2 song shona marathi movie
Next Stories
1 तनुश्री दत्तामुळे आली ‘बिग बीं’वर ट्रोल होण्याची वेळ
2 Happy Birthday Lata Mangeshkar:जाणून घ्या, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ‘या’ गोष्टी
3 Happy Birthday Ranbir Kapoor : बॉलिवूडचा ‘कॅसिनोव्हा’ रणबीरने केलेय या अभिनेत्रींना डेट
Just Now!
X