विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या चित्रपटातील ‘आम्ही लग्नाळू’ या गाण्याने तरुणाईला तुफान वेड लावलं होतं. त्यामुळे तिच धम्माल मस्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी चित्रपटाची टीम सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘बॉईज २’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील आयटम साँग नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बॉईज’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सनी लिओनीने ‘कुठं कुठं जायाचं हनिमून’ला या गाण्यावर ठसकेबाज लावणी केली होती. त्यामुळे ‘बॉईज २’ मध्ये एखादी लावणी नसेल तर नवलचं आहे. या चित्रपटातील ‘तोडफोड’ हे प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे हे आयटम साँग तरुणाईचं चांगलंच मनोरंजन करत असल्याचं दिसून येत आहे.

संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्तेने या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे लेखक हृषिकेश कोळीने हे गाणं शब्दबद्ध केलं आहे. तर मुग्धा कऱ्हाडे, गणेश चंदनशिवे आणि प्रसेनजीत कोसंबी यांचा सुमधूर आवाज लाभला आहे. दरम्यान, या गाण्यात प्रसिध्द कलाकार गिरीश कुलकर्णी यांचा हटके अंदाज आपल्याला पाहता येणार आहे.

उडत्या लयीचं हे गाणं वाढदिवसावर आधारित असून या गाण्यात सुवर्णा काळे थिरकताना दिसत आहे. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा चित्रपट विशाल देवरुखकर यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘बॉईज’ चा हा सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Launches boys 2 song todfod marathi movie
First published on: 24-09-2018 at 10:10 IST