News Flash

Video : ‘हृदयात समथिंग समथिंग’ चा अनोखा टीझर पाहिलात का ?

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित 'हृदयात समथिंग समथिंग' चित्रपटाचा टीझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे.

Video : ‘हृदयात समथिंग समथिंग’ चा अनोखा टीझर पाहिलात का ?

गेल्या अनेक वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आणि रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेते अशोक सराफ ‘हृदयात समथिंग समथिंग’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ते लव्ह गुरुच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपटाचा टीझर नुकताच युट्यूबवर लाँच झाला आहे. प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये प्रेमातील गमतीजमती दाखविण्यात आल्या असून आपल्या प्रिय व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी प्रेमवीरांनी केलेली धडपडही रंगविण्यात आली आहे. त्यामुळे हा टीझर आताच्या तरुणाईच्या जवळ जाणारा असल्याचं दिसून येत आहे.

 

या टीझरमध्ये अभिनेता अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक सराफ झळकले आहे. टीझर प्रदर्शित होताच या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे.

‘प्रेमात पडल्यावर आपल्या खास व्यक्तीला इम्प्रेस करताना प्रेमवीरांची कधी-कधी त्रेधातिरपिट उडते. ह्या त्रेधातिरपिटीमधल्याच गमतीजमती ‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटामध्ये तुम्हांला पाहायला मिळणार आहे, असं दिग्दर्शक प्रविण राजा कारळे म्हणाले’. दरम्यान, पिरॅमिड फिल्म्स हाऊस प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे यांनी केली आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2018 5:53 pm

Web Title: launches hrudhayat something something teaser marathi movie
Next Stories
1 बॉलिवूडमधील ‘या’ दिग्दर्शकामुळे आला कंगनाच्या अभिनयाला आकार
2 ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बिग बॉसच्या घरात जाणार?
3 …म्हणून दिव्या दत्ताविरोधात तक्रार दाखल
Just Now!
X