02 March 2021

News Flash

रेमो डिसूजा येणार ‘लाव रे तो व्हिडिओ’ कार्यक्रमात

रसिक सुनील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक छान गाणं गाणार आहे

‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं टॅलेंट पहायला मिळतंय. कारण कार्यक्रमाची संकल्पनाच तशी आहे, सर्वसामान्य कलाकार किंवा माणसांनी त्यांच्याकडचं कौशल्य किंवा त्यांना अवगत असलेली कला कुसर एका व्हिडिओच्या माध्यमातून शुट करतात आणि तो व्हिडिओ या कार्यक्रमामध्ये पाठवतात. त्या व्हिडिओंना या कार्यक्रमामध्ये दाखवलं जातंय.

देशभरातल्या लॉकडाउनमुळे घरातल्या घरात अशा पद्धतीचे व्हिडिओ शुट करुन एका लोकप्रिय वाहिनीवर झळकण्याची ही संधी अनेक जण घेतायत. या कार्यक्रमाच्या संकल्पनेमुळे प्रेक्षकच नाही तर कलाकारांचा देखील लाव रे तो व्हिडिओ हा आवडता कार्यक्रम ठरतोय आणि म्हणूनच या आठवड्यात प्रेक्षकांना कलाकारांचे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळणार आहेत.

या कार्यक्रमात प्रेक्षकांची लाडकी शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिक सुनील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी एक छान गाणं गाणार आहे. ज्यांच्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावेल आहे असे सर्वांचे लाडके नेते रामदास आठवले त्यांच्या लॉकडाउनमध्ये लिहिलेल्या कविता प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत. महाराष्ट्राची आई सिंधुताई सकपाळ यांनी डॉ. निलेश साबळेचे सगळ्यांना हसवण्याच्या अविरत प्रयत्नांसाठी त्याचं खूप कौतुक केलं.

हास्यसम्राट सुनील पाल याचा प्रेक्षकांना हसवण्यात हातखंडाच आहे. सुनील पाल वेगवेगळ्या लोकांची मिमिक्री करून प्रेक्षकांना हसवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. यांच्या सोबतच हास्यसम्राट राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप आणि संगीतकार रोहन रोहन यांचे व्हिडिओ देखील प्रेक्षकांना या आठवड्यात पाहायला मिळतील. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवणारा सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा देखील या कार्यक्रमाला चार चांद लावणार आहे. रेमोचा स्वॅग प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 2:58 pm

Web Title: lav re toh video celebrity video avb 95
Next Stories
1 Video : सुयश टिळकला अशाप्रकारे मिळाली बॉलिवूडची ऑफर
2 प्रसन्नसमोर उघड झालं सई आणि नचिकेतच्या प्रेमाचं सत्य
3 ‘क्रिश’, ‘रा-वन’ला टक्कर देणार शक्तिमान
Just Now!
X