‘लाव रे तो व्हिडिओ’ या कार्यक्रमामध्ये सध्या महामुकाबला स्पर्धेची जोरदार तयारी सुरु आहे. ज्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्हिडिओज येत आहेत. या कार्यक्रमाचे जेवढे भाग आत्तापर्यंत झाले त्या भागांमधल्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओजमध्ये ही महामुकाबला स्पर्धा घेण्यात येतेय.

यामध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय तो छोटासा गायक धीरज शेगार. धीरजच्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आवाज आणि गाण्याचा लहेजा हा मराठीतला आघाडीचा गायक आदर्श शिंदेची आठवण करुन देतो. आदर्शसारखा दमदार आवाज आणि तेवढीच भक्कम सुरांची साथ धीरज शेगारला लाभलीये. या महामुकाबल्यासाठी धीरजने दोन भक्तीगीतांचे व्हिडिओज सुरबद्ध करुन पाठवलेत. आता पहायचे धीरज या महामुकाबलामध्ये सर्वोच्च जागा पटकवतोय का नाही ते.

धीरज सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उमेदीच्या कलाकारांचे व्हिडिओज या मुकाबल्यासाठी पाठवले गेलेत. यात नृत्याचे व्हिडिओज, गाण्याचे, म्युझिकल मॅशअप तसेच स्टॅन्डअप कॉमेडीचे व्हिडिओज समाविष्ट आहेत. या महामुकाबल्यामधून एक अंतिम महाविजेता निवडला जातोय. ज्याला दहा हजार रुपयांची रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाईल.