News Flash

‘लक्ष्मी घर आयी’ मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेची पटकथा ही भारतात सुरु असलेल्या हुंडा प्रथेवर असणार आहे.

या मालिकेची पटकथा ही भारतात सुरु असलेल्या हुंडा पद्धतीवर असणार आहे.

नुकतीच ‘स्टार भारत’ने आपला बहुप्रतीक्षित शो ‘लक्ष्मी घर आयी’च्या प्रसारणाची तारीख जाहीर केली आहे. शकुंतलम टेलीफिल्म्स निर्मित हा शो ५ जुलै २०२१ रोजी पासून आपल्याला टिव्हीवर पाहता येईल. अष्टपैलू अभिनेत्री अनन्या खरे, प्रतिभावान अभिनेता अक्षित सुखीजा आणि रुपवती अभिनेत्री सिमरन परींजा या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका मालिकेमध्ये आहेत.

आणखी वाचा : जब तर है जान : शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो- शरीब हाश्मी

देशभरात चालू असलेल्या हुंडा प्रथेवर शो मधून प्रकाश टाकला जाईल. या शोची कथा एका अशा मुलीची आहे की, जी लग्नानंतर नवऱ्याच्या घरी येताना धन-दौलत आणि संपत्ती ऐवजी भरपूर प्रेम आणि आपलेपणा घेऊन येते, जी गोष्ट नवऱ्याच्या कुटुंबाला नाराज करणारी ठरते. अनपेक्षित परिस्थिती आणि अनोळखी कुटुंबाशी जळवून घेण्यासाठी एखादी मुलगी कशी उत्साही असेल? याचे चित्रण शोच्या कथेत पाहायला मिळेल. कथेत मैथीलीचा प्रवास दाखविला जाईल आणि लग्नानंतर सून प्रेम, माया आणि आपुलकीने जोडून ठेवत लग्न हा किती महत्त्वाचा ठेवा आहे, हेही दाखवलं जाईल.

आणखी वाचा : Video : जान्हवीने हातात चप्पल पकडून मित्र-मैत्रिणींसोबत केला डान्स

जेव्हा अक्षतला मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला, “छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी मला यापेक्षा चांगला शो मिळाला नाही. प्रदर्शणा बद्दल मी खरोखर उत्साही आहे. माझा असा विश्वास आहे की अशा उत्कृष्ट कथानकासह शोमध्ये मुख्य भूमिका करणे हा एक सन्मान आहे. या शोमधून मुलगी उत्तरदायित्व नाही, असा संदेश समाजात पसरेल, अशी मी आशा करतो. माझी अशी अपेक्षा आहे की, शो चांगला होईल आणि आम्ही आमच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 6:30 pm

Web Title: laxmi ghar aai go to released in few days hindi serial update dcp 98
Next Stories
1 ‘ATMमधून पैसे काढले आणि बाहेर आलो तर…’, संचितने सांगितला धक्कादायक अनुभव
2 जब तक है जान : शाहरुखला पहिल्यांदा भेटल्यानंतर मी बेशुद्ध झालो होतो- शरीब हाश्मी
3 रेनबो ड्रेस परिधान करत ‘चुलबुल अवतार’ मध्ये दिसली शमा सिकंदर
Just Now!
X