कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. लक्ष्मीची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर खऱ्या आयुष्यातही हरहुन्नरी आहे. अभिनयासोबतच समृद्धीला नृत्याचीदेखील फार आवड आहे. म्हणूनच समृद्धी लहानपणापासून कथ्थकचे शिक्षण घेत आहे.

ठाण्यामधील नुपूर नृत्यालयात तिने नृत्याचे धडे गिरवले. यावर्षी समृद्धी विशारद पूर्णच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. सध्या समृद्धी शूटींगचं व्यग्र वेळापत्रक सांभाळून तिची ही आवड देखील उत्तमरीत्या जोपासत आहे असं म्हणायला हरकत नाही. कथ्थकबरोबरच समृद्धी लावणी, हिप हॉप, बॉलिवूड, वेस्टर्न याप्रकारचे नृत्य देखील लीना भोसले शेलार यांच्याकडून शिकत आहे.

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Loksatta vasturang Gudhipadva 2024 Buy news house car goods
गुढीपाडव्याला उंचे गुढी उभवावी
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
samruddhi kelkar
समृद्धी केळकर

वाचा : ..म्हणून प्रभासने नाकारला होता भन्साळींचा ‘पद्मावत’  

यावर बोलताना समृद्धी म्हणाली, ‘माझी नृत्याची आवड बघून आईने मला लहानपणीचं कथ्थक शिकण्यासाठी पाठवलं. गेल्या १३-१४ वर्षांपासून किंबहुना त्याहून जास्त वर्षांपासून मी कथ्थक शिकत आहे. मी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातर्फे कथ्थकच्या परीक्षा देत होते. यावर्षी मी विशारद पूर्ण झाले याचा मला आनंद आहे. कथ्थकच्या परीक्षा खूप कठीण असतात, जवळपास सहा तास या परीक्षा सुरु असतात. कथ्थक शिकण्याचा उपयोग आज मला लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये अभिनय करताना देखील होत आहे.’