19 March 2019

News Flash

लक्ष्मी सदैव मंगलम् मध्ये रंगणार लक्ष्मीच्या मेहेंदीचा सोहळा!

या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरुच आहेत

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमध्ये सध्या लक्ष्मीच्या लग्नाची तयारी सुरु आहे. लक्ष्मीसुध्दा बरीच आनंदी आहे कारण, आता तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार लवकरच मिळणार आहे. दारी मंडप सजल आहे, लग्नाची लगबग सुरु झाली आहे. लक्ष्मी लवकरच तिच्या नव्या आयुष्यात पाऊल ठेवणार आहे, दारी नवर देवाची वरात येणार आहे. परंतु या सगळ्यामध्ये मामीची कारस्थानं सुरुच आहेत. या लग्नसराईत आता लक्ष्मीच्या हाताला मेहंदी लागणार आहे. त्यातलेच काही क्षण आणि लक्ष्मीचा आनंद तुम्ही या फोटोंमध्ये मध्ये पाहू शकता.

नवरी मुलीच्या हाताला मेहेंदी लावताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावं लिहितात असं म्हणतात. पण आता लक्ष्मीचा हात कोणाच्या हाती जाईल? तिच्या स्वप्नातला राजकुमार कोण असेल? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका लक्ष्मीचा मेहंदीचा सोहळा आणि पाहा लक्ष्मीचा विवाहसोहळा लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये ११ जून ते १६ जून संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

First Published on June 14, 2018 6:21 pm

Web Title: laxmi sadaiva mangalam episode details