News Flash

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलीचं हॉट फोटोशूट पाहिलंत का?

मराठीतील या स्टारकिडची सोशल मीडियावर चर्चा

स्वानंदी बेर्डे

बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सची चर्चा तर नेहमीच चर्चा होत असते. पण आता मराठीतीली स्टारकिड्सही मागे नाहीत. मराठीतील अशाच एका स्टारकिडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. यामागचं कारण म्हणजे तिचं हॉट फोटोशूट. ही स्टारकिड आहे, लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे.

स्वानंदीने नुकतंच फोटोशूट केलं असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. स्वानंदी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती बरेच फोटो पोस्ट करत असते. तिने नुकतंच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

आणखी वाचा : महेश कोठारेंच्या सुनेनं केला मेकओव्हर; बघून अभिनेत्रीही झाल्या अवाक्

स्वानंदी सोशल मीडियावर आई प्रिया बेर्डे यांच्यासोबतचेही फोटो पोस्ट करत असते. हे फोटो पाहून स्वानंदी ही प्रिया बेर्डे यांच्या मुलीपेक्षा मैत्रीण जास्त वाटते. मुलगा अभिनयपाठोपाठ आता मुलगी स्वानंदीसुद्धा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या दोन्ही मुलांच्या चित्रपटसृष्टीतील एंट्रीमुळे त्यांची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे या प्रचंड आनंदित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 10:02 am

Web Title: laxmikant berde daughter swanandi berde hot photoshoot ssv 92
Next Stories
1 व्हायचं होतं डॉक्टर, पण झाला अभिनेता; कारण…
2 जावेद जाफरी : कॉमेडियन, डान्सर ते अष्टपैलू अभिनेता
3 नाटय़कर्मी घडवणाऱ्या महाविद्यालयीन नाटय़संस्था
Just Now!
X