मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बर्डे सध्या चर्चेत आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या सर्व चर्चा रंगल्या आहेत. तिने या पोस्टमध्ये लहानपणीचा फोटो शेअर केला असून मला माझे बालपण परत हवे असे तिने म्हटले आहे.

स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वानंदी क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लहानपणी केलेली मजा, मस्ती आता आठवून हसू येते असे म्हटले असून मला माझे बालपण परत हवे असे म्हटले आहे. तिची ही भावूक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

स्वानंदी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. ती किशोर बेळेकर यांच्या ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात येणार. आता स्वानंदीला चित्रपटात भूमिका साकारताना पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.