24 October 2020

News Flash

अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

अक्षय कुमारवर प्रेक्षक संतापले; केली चित्रपट बॅन करण्याची मागणी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र हा ट्रेलर पाहून काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी काही प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटाच्या नावात ‘लक्ष्मी’ हा शब्द असल्याने काही प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमारने हिंदू देवतांचा अपमान केला आहे. शिवाय चित्रपटात हिंदू-मुस्लिम तरुणांचं प्रेमप्रकरण दाखवून लव्ह जिहादचा प्रचार केला जातोय अशीही टीका काही प्रेक्षक करत आहेत.

पाहूया काय म्हणतायेत टीकाकार?

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:51 pm

Web Title: laxmmi bomb akshay kumar love jihad mppg 94
Next Stories
1 निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
2 “मला लिंबू पाणी दिलं तरच…”; सोनू सूदची अजब अट
3 ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत नवा ट्विस्ट
Just Now!
X