आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटात सहायक अभिनेत्याच्या भूमिका गाजविल्यानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला सध्या मुख्य भूमिका असलेले चित्रपट मिळत असले तरी त्याला याचे काहीच नवल वाटत नाही. चित्रपटात मुख्य भूमिका मिळावी याला मी प्राधन्य देत नाही, असे नवाजुद्दीन म्हणाला. नवाजुद्दीनचा नुकताच ‘रामन राघव २.०’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीनच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

चित्ररंग : एकाच नाण्याच्या दोन गोंधळलेल्या बाजू

मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांबाबत नवाजुद्दीन म्हणतो की, मी माझ्या मुख्य भूमिका असलेले चित्रपट करतो, पण चित्रपटाची कथा रंजक असायला हवी. फक्त मुख्य भूमिका मिळतेय म्हणून चित्रपट करायचे असा माझा अजिबात हेतू नसतो. चित्रपटातील भूमिका प्राप्त करणे याला मी प्राधान्य देत नाही. मला चित्रपटाची कथा आणि माझे पात्र मला स्वत:ला भावलं पाहिजे.
नवाजुद्दीनने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिकांना प्रशंसेची पावती देखील अनेक दिग्गजांनी दिली आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गज माझ्या कामाचं कौतुक करतात, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला सध्या अनेक चित्रपट निर्माते गळ घालतात, पण सर्वांना होकार देणं शक्य नाही. माझ्यासमोर असलेल्या चित्रपटांच्या विविध पर्यायांमधून योग्य निवड करावी लागत आहे, असेही तो पुढे म्हणाला.