News Flash

छोट्या पडद्यावर जेनिफर विंगेट देणार ‘बोल्ड सीन’

सध्याची ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे

जेनिफर विंगेट

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जेनिफर विंगेटचं नाव घेतलं जातं. सध्याची ती सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. सोनी टीव्हीवरील ‘बेहद’ मालिकेत खलनायकीची व्यक्तिरेखा साकारणारी जेनिफर आता लवकरच नव्या मालिकेत रोमॅण्टिक भूमिका साकारणार आहे.

Ganesh Chaturthi 2017: सुबोध भावेच्या घरी बाप्पाचं आगमन

जेनिफर कलर्स वाहिनीवरील ‘अधुरा अलविदा’ या मालिकेत दिसणार आहे. नुकतेच या मालिकेचा पायलट शो चित्रीत करण्यात आला. ही मालिका अजून सुरूही झाली नाही आणि सेटवरचे फोटो लीक व्हायला सुरूवातही झाली. नुकतेच या मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण सुरू असतानाचे फोटो लीक झाले आणि सोशल मीडियावर काही तासांतच व्हायरलही झाले. ‘अधुरा अलविदा’ या मालिकेत जेनिफर अनेक बोल्ड सीन देणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘अधुरा अलविदा’ या मालिकेच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये जेनिफर आणि सेहबान अझीम हे एकमेकांच्या फार जवळ असल्याचे दिसतात. असे म्हटले जाते की या मालिकेची कथा राजेश खन्ना यांचा प्रसिद्ध सिनेमा कटी पतंग यावर आधारित आहे. या मालिकेत ती विधवेची भूमिकेत दिसणार आहे.

Ganesh Chaturthi 2017: बॉलिवूडकरांनी असे केले बाप्पाचे स्वागत

जेनिफरची ‘बेहद’ मालिका लवकरच बंद होणार आहे. ‘अधुरा अलविदा’ या मालिकेतून ती पहिल्यांदा हर्षद चोप्रासोबत काम करणार आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात ही मालिका प्रदर्शित करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2017 7:19 pm

Web Title: leaked here is jennifer winget sehban azim hot scene from adhura alvida
Next Stories
1 2.0 : रजनीकांत, अक्षय कुमारच्या ‘२.०’ सिनेमाचे मेकिंग प्रदर्शित
2 Ganesh Chaturthi 2017 VIDEO : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचा जल्लोष
3 PHOTO : रणबीर कपूरच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये दिसली ‘ती’
Just Now!
X