14 December 2017

News Flash

‘बजरंगी भाईजान’मध्ये काम करण्यास नकार दिला म्हणून सलमानची कंगनाला शिवीगाळ

तू का एवढा अभिनय करतेस? तुझ्यासारखे लोक फार पुढे जात नाहीत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 2:48 PM

सलमान खान

कंगना आणि हृतिकमधील वादात दर दिवशी नवीन गोष्टींची भर पडत आहे. या वादात बॉलिवूडमधील अनेक व्यक्तिंची नावे पुढे आली आहेत. मिड-डेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कंगनाने हृतिकला २०१४ मध्ये लिहिलेली मेल लीक झाली आहेत. त्यातल एका मेलमध्ये कंगनाने सलमान खान, करिना कपूर आणि कतरिना कैफच्या नावाचा उल्लेख केला आहे.

या मेलमध्ये कंगनाने हृतिकला लिहिले की, ‘बजरंगी भाईजान’मध्ये काम करण्यास नकार दिला म्हणून सलमानने तिला शिवीगाळ केली होती. कंगनाच्या मते, सलमानने पहिल्यांदा या सिनेमासाठी कंगनाला विचारले होते. पण कंगनाने या सिनेमाला स्पष्ट नकार दिला होता. रिपोर्टनुसार कंगनाने लिहिले की, तू ‘बिग बॉस’मध्ये गेला होतास, ‘बिग बॉस’मध्ये जाणं चांगली गोष्ट आहे आणि मला आनंदही आहे की तू सलमानला भेटला नाहीस. तो फार विचित्र आहे. जेव्हा मी ‘बजरंगी भाईजान’मध्ये काम करण्यास नकार दिला तेव्हा तो म्हणाला की करिना हा सिनेमा करतेय. मी तुला ही व्यक्तिरेखा दिली कारण यातून करिनाचा काही फायदा झाला नसता पण तुझे करिअर फार पुढे गेले असते.

कंगनाने पुढे लिहिले की, तो वेडा आहे का? ‘बजरंगी भाईजान’मधील करिनाची व्यक्तिरेखा माझे करिअर कसे घडवू शकली असती? त्याच्या आतापर्यंतच्या कोणत्या हिरोईनचे करिअर झाले आहे. मला सगळ्यांनी याच्यासोबत काम न करण्याचा सल्ला दिला. त्याच्यासोबत कधी काम न केल्यामुळे मी लोकांना आवडते. त्याला माहितीये का की जे लोक माझ्यावर पैसे लावतात त्या सर्व दिग्दर्शक, निर्माते आणि स्टुडिओंनी मला त्याच्यासोबत काम न करण्याचा सलाला दिला आहे. त्याच्यासोबत काम केले तर माझा ब्रॅण्ड खराब होईल अशीच भिती साऱ्यांना आहे.

कंगनाने पुढे लिहिले की, तो माझी थट्टा करायचा. एकदा तो मला म्हणाला होता की तू का एवढा अभिनय करतेस? तुझ्यासारखे लोक फार पुढे जात नाहीत. कतरिनाला बघ ती एक उत्तम अभिनेत्री आहे. सुंदर दिसते आणि तोंड बंद ठेवते. मी त्याला म्हटले की तू १९ साव्या शतकात असल्यासारखे बोलतोस. मला कतरिना किंवा सलमान होण्यात काही रस नाही. माझ्या या बोलण्यावरुन त्याला फार राग आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. या घटनेनंतर आम्ही एकमेकांचा चेहरा २ वर्षे झाली तरी पाहिला नाही. त्याने मला अनेक फोन केले, मेसेज केले पण मी कोणत्याच गोष्टींचे उत्तर दिले नाही.

यानंतर त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीही फोन केला होता. मी तेव्हा त्याला फक्त ५ मिनिटं भेटले. ‘क्वीन’च्या प्रदर्शनानंतर सलमानला मला भेटण्याची इच्छा होती, पण त्याला भेटाव असं मला वाटलंच नाही. ‘बजरंगी भाईजान’ हा सिनेमा ही त्याने मला त्यानंतरच देऊ केला होता. वाईट लोकांसोबत नेहमी असेच होते.

First Published on October 12, 2017 2:48 pm

Web Title: leaked mail of kangana ranaut to hrithik roshan says that salman khan abused kangna for not working in his film bajrangi bhaijaan