22 September 2020

News Flash

बॉलिवूडच्या ‘खान’दानला मात देत दीपिका ठरली ‘नंबर वन स्टार’

दीपिकानं बॉलिवूडच्या तिन्ही खानला मागे टाकत लोकप्रियतेच्या बाबातीत पहिलं स्थान मिळवलं आहे.

दीपिका पादुकोन

अभिनेत्री दीपिका पादुकोनसाठी २०१८ हे वर्ष खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरलं. ‘पद्मावत’ सिनेमाला मिळालेल्या भरभरून यशानं तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली. पण या यशाबरोबर तिचा आनंद द्विगुणीत करणारी आणखी एक गोष्ट ठरली आहे तिला २०१८ मधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनही घोषीत करण्यात आलं आहे. IMDb संकेतस्थळानुसार दीपिकानं बॉलिवूडच्या तिन्ही खानला मागे टाकत लोकप्रियतेच्या बाबातीत पहिलं स्थान मिळवलं आहे.

आतापर्यंत सलमान खान, शाहरूख आणि आमिर हे लोकप्रियतेच्या बाबातीत वरचढ असायचे मात्र या सगळ्यांना टक्कर देत दीपिका आजच्या घडीची नंबर वन स्टार ठरली आहे. प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर IMDb नं ही यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत दीपिकानंतर दुसऱ्या स्थानावर शाहरूख, तिसऱ्या स्थानावर आमिर, चौथ्या स्थानी ऐश्वर्या आणि पाचव्या स्थानावर सलमान खान आहे.

नुकतंच एका मासिकानं दीपिकाला आशियातील सर्वात मादक अभिनेत्रीच्या यादीतही पहिलं स्थान दिलं आहे. ती बॉलिवूडमधली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रीही ठरली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत राधिका आपटेनंही पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मध्ये कुक्कूची भूमिका साकारणाऱ्या कुब्रा सैतचाही समावेशही पहिल्या दहामध्ये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 3:55 pm

Web Title: leaves all khan behind deepika padukone is imdbs top indian star of 2018
Next Stories
1 ‘मला तो अवयव सर्वाधिक आवडतो’, तापसीच्या उत्तराने नेटकरीही गोंधळले
2 रोहित शेट्टी म्हणतोय…. म्हणून साराला दिलं ‘सिम्बा’मध्ये काम
3 लग्नातील उरलेलं अन्न वाया न घालवता कपिलनं ते गरीबांना केलं दान
Just Now!
X