News Flash

..आणि आजींनी तिच्यासोबत सेल्फी काढला

ती खरेदीसाठी ठाणे येथील एका मॉलमध्ये गेली होती.

नक्षत्रा मेढेकर

‘लेक माझी लाडकी’तील सानिका मिळवतेय चाहत्यांची दाद

‘लेक माझी लाडकी’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत नायिका असलेली सानिका चाहत्यांची दाद मिळवत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या नक्षत्रा मेढेकरला चाहत्यांनी भेटून तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.

वाचा : ‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात

आपली भूमिका प्रेक्षकांना आवडतेय, याचे काही अनुभव नक्षत्राला नुकतेच आले. गणेशोत्सवानिमित्त नक्षत्रा खरेदीसाठी ठाणे येथील एका मॉलमध्ये गेली होती. तिथं तिला एका आजींनी ओळखलं. इतकंच नाही, तर आपल्या सुनेला आणि नातीला बोलावून घेतलं. त्या तिघींनाही तिचा अभिनय आवडत असल्याचं आवर्जून सांगितलं आणि तिच्याबरोबर सेल्फीही काढला. त्यापूर्वी नक्षत्रा नगरला एका इव्हेंटसाठी गेली होती. नगरमधील एका रेडिओ स्टेशनवर तिची मुलाखत होती. त्या रेडिओ स्टेशनवरील आरजे चैतालीला नक्षत्रा अर्थात सानिका आल्याचं माहीत नव्हतं. मात्र, नक्षत्राला पाहिल्यावर ती एकदम खूश झाली. ती नक्षत्राची खूप मोठी फॅन होती. त्यामुळे त्या दोघींनी मालिका, सानिकाची व्यक्तिरेखा या विषयी गप्पा मारल्या.

वाचा : सनी लिओनीला भाड्याने दिलेल्या घराचे वॉशरुम पाहून भडकली सेलेना जेटली

‘खलनायक किंवा ग्रे शेड साकारलेल्या कलाकारांवर अनेकदा प्रेक्षक राग व्यक्त करतात. मला मात्र तसा अनुभव आला नाही. उलट, माझी भूमिका ग्रे शेडची असूनही प्रेक्षकांना आवडतेय, हे पाहून मला फार छान वाटलं,’ असं नक्षत्रानं सांगितलं.

भरकटत चाललेल्या आपल्या नवऱ्याला म्हणजेच साकेतला पुन्हा संसाराकडे आकर्षित करायला, मालिकेमध्ये सानिकाने मॉडर्न लूक स्वीकारला आहे. भावनिक नात्यांतील सुरेख गुंतागुंत ‘लेक माझी लाडकी’ मालिकेत पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 12:19 pm

Web Title: lek majhi ladki fame nakshtra medhekar take selfie with her older fan
Next Stories
1 ‘रुद्रम’ ग्राफिकल मालिका स्वरुपात
2 ‘या’ अभिनेत्रीने सलमानला सहा वेळा केलं रिजेक्ट
3 सनी लिओनीला भाड्याने दिलेल्या घराचे वॉशरुम पाहून भडकली सेलेना जेटली
Just Now!
X