News Flash

“होय गौरवर्णीय असल्याचा फायदा मिळाला”; वर्णद्वेषाच्या आरोपांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

पाश्चात्य देशांमध्ये वर्णद्वेषाविरोधात आंदोलन सुरु आहे

पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. परिणामी कृष्णवर्णीय लोकांनी तेथील प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. ‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ असं म्हणत सुरु असलेल्या या आंदोलनाला हॉलिवूडमधील अनेक नामांकित सेलिब्रिटींनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान या आंदोलनामुळे अभिनेत्री लीना डनहमवर मात्र ट्रोल होण्याची वेळ आली आहे. केवळ गौरवर्णीय असल्यामुळे तिला काम मिळत होतं असा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यावर केला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वाढत्या ट्रोलिंगमुळे तिने हा आरोप आता मान्य केला आहे.

एचबीओवरील ‘गर्ल्स’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेल्या लीनाला अभिनय बिलकूल येत नाही. केवळ गौरवर्णीय असल्यामुळे तिला काम मिळालं होतं. ती जर कृष्णवर्णीय असती तर तिला निर्मात्यांनी उभं देखील केलं नसतं. असा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून लीना विरोधात सोशल मीडियाद्वारे केला जात आहे. या आरोपांवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने हे आरोप मान्य केले आहेत.

“हा कुठल्याही प्रकारचा संवाद नाही. हॉलिवूड गौरवर्णीयांना अधिक प्रोत्साहन देतं हेच तुम्हाला माझ्याकडून ऐकायचं आहे. हे खरं आहे, गौरवर्णीय असल्याचा करिअरमध्ये मला फायदा मिळाला.” अशा आशयाचे ट्विट करुन तिने प्रतिक्रिया दिली आहे. लीनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ‘ब्लॅक लिव्ह्स मॅटर’ या चळवळीच्या पार्श्वभूमीवर काही नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 1:31 pm

Web Title: lena dunham admits privilege helped her early in her career mppg 94
Next Stories
1 ‘सूर्यवंशी’मधून करण जोहरचं नाव हटवलं?
2 सुशांतच्या Wikipedia पेजसंदर्भातही गूढ वाढलं; मृत्यूच्या बातमीआधीच…
3 घराणेशाहीच्या वक्तव्यावरून नेटकऱ्यांनी उडवली सैफची खिल्ली
Just Now!
X