News Flash

रियाच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांनी पोस्ट केला ‘तो’ खास मजकूर

रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला पाठिंबा देत सोशल मीडियावर एक खास मजकूर पोस्ट केला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) मंगळवारी अटक केली. रियाच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला पाठिंबा देत सोशल मीडियावर एक खास मजकूर पोस्ट केला. अटकेपूर्वी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात जाताना रियाने जो टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर तोच मजकूर होता. ‘पुरुषप्रधान व्यवस्थेला संपवू’, अशा आशयाचा मजकूर होता आणि रियाच्या अटकेनंतर अनेक मोठ्या कलाकारांनी सोशल मीडियावर तो पोस्ट केला.

राधिका आपटे, तापसी पन्नू, विद्या बालन, हुमा कुरेशी, साकीब सालीम, सोनम कपूर, अभय देओल, फरहान अख्तर, झोया अख्तर, शिबानी दांडेकर, दिया मिर्झा, पुलकीत सम्राट, अनुराग कश्यप यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रियाला न्यायालयीन कोठडी

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली. अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एनसीबीने केला. एनसीबीचे पथक रविवारपासून रियाची चौकशी करत होते. याआधी रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, नोकर दीपेश सावंत, अमली पदार्थ विक्रेता झैद विलात्रा, कैझान इब्राहिम, अब्देल बसीत परिहारसह नऊ जणांना एनसीबीने अटक केली आहे. त्यापैकी शोविक, सॅम्युअल, दीपेश यांच्यासमोर रियाची चौकशी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 12:44 pm

Web Title: lets smash patriarchy announces bollywood celebs along with rhea chakraborty ssv 92
Next Stories
1 ‘कंगनाच घर दिसलं, मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेलं अनधिकृत बांधकाम दिसत नाही?’
2 ‘कदाचित तू इतकी वाईट…’; चित्रपट निर्मात्याने व्यक्त केली रियासोबत काम करण्याची इच्छा
3 ‘कंगनामुळे महाराष्ट्र व मुंबईचं नाव बदनाम होतंय’; अभिनेत्रीने केली टीका
Just Now!
X