News Flash

‘लाईट हाऊस’मधून मिळणार लघुपटांना मिळणार दर्जेदार व्यासपीठ

खादा माहितीपट तरी करावा, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. या लघुपटासाठीची साधनं आज सहज उपलब्ध आहेत.

लघुपट हे सर्जनशील अभिव्यक्ती व प्रयोगाचे माध्यम आहे. आपल्याला जे भावलं,  आवडलं ते कॅमे-यात बंदिस्त करायला आजच्या युवा वर्गाला खूप आवडतं. एखादा माहितीपट तरी करावा, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. या लघुपटासाठीची साधनं आज सहज उपलब्ध आहेत. मात्र तयार झालेल्या या लघुपटांना योग्य व्यासपीठच नसल्याने अनेक चांगले लघुपट रसिकांपर्यंत पोहचत नाही. हीच बाब हेरून ‘झी टॉकीज’ नव्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या उदिष्टाने ‘टॉकीज लाईट हाऊस’ हा आगळा वेगळा उपक्रम सुरु करणार आहे.
‘टॉकीज  लाईट हाऊस’ या नव्या उपक्रमाद्वारे ‘झी टॉकीज’  आता लघुपटांसाठी एक नवं दालन खुलं करणार आहे. मराठीत तसेच जगभरात तयार होणाऱ्या उत्तम लघुपटांना योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी एखाद्या वाहिनीने पुढाकार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘टॉकीज लाईट हाऊस’ या नावाची सुद्धा एक खासियत आहे. टॅलेंट असूनही प्रकाशात नसलेल्या कलाकर्मींना प्रकाशझोतात आणणार व्यासपीठ म्हणून या उपक्रमाचं नाव ‘टॉकीज लाईट हाऊस’ असं ठेवण्यात आलं आहे.
मराठी तसेच जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील निवडक लघुपट कलाकृतीं  ‘झी टॉकीज’वर प्रेक्षकांना पहाता येतील. सुरवातीच्या भागांमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते ख्यातनाम दिग्दर्शकांच्या लघुपटांचा यात समावेश असेल.  दाखवण्यात येणाऱ्या लघुपटाच्या वेळी दिग्दर्शकाचा लघुपट बनवण्यामागचा विचार तसेच दिग्दर्शकाला लघुपट करताना व तो प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात आलेल्या अडचणीसुद्धा जाणून घ्यायला मिळणार आहे. लघुपटांच्या स्क्रीनिंगसोबतच लघुपट मार्गदर्शनाची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. चित्रपटक्षेत्रात येवू पाहणाऱ्या उत्साही आणि हौशी तरूणांना ही कार्यशाळा म्हणजे एक सुवर्णसंधी असेल. याच दरम्यान लघुपटांसाठी प्रवेशिका मागवत इच्छुक नव्या दिग्दर्शकांना लघुपट तयार करण्याची संधी दिली जाणार आहे. ‘यानंतरच्या भागात लघुपट महोत्सव आयोजित केला जाणार असून शॉर्ट फिल्म् विजेत्याची घोषणा या महोत्सवाच्या वेळी करण्यात येणार आहे.  या महोत्सवाच्या वेळी नामवंत दिग्दर्शकांचे अनुभवांचे बोल सर्वांनाच जाणून घ्यायला मिळतील. झी टॉकीजवर ‘टॉकीज लाईट हाऊस डे’  असा एक विशेष दिवस साजरा केला जाणार आहे. या नव्या अंदाजातल्या ‘टॉकीज लाईट हाऊस’ डे’ मध्ये स्पर्धेतल्या निवडक लघुपटांसोबत विजेता लघुपट दाखवण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:02 pm

Web Title: light house new opportunity for short films
Next Stories
1 ‘कार्टी काळजात घुसली’ची शंभरी!
2 मणीरत्नम यांचा चित्रपट हिंदीत
3 सोनाली बेंद्रे करणार मराठीत पुनर्पदार्पण?
Just Now!
X