22 February 2020

News Flash

Photo : लीसा हेडनने स्विमसूटमध्ये शेअर केला बेबी बंपचा फोटो

लिसाने डिनोसोबत गुपचूप लग्न केलं होतं

लिसा हेडन

अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात नावारुपास आलेली लिसा हेडन सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. अनेक वेळा हॉट फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत येणारी लिसा दुसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या लिसा गरोदरपणातील दिवसांचा मनमुराद आनंद लूटत असून तिने बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लिसाने स्विमसूट घातला असून तिचं बेबी बंप दिसत आहे.

लिसाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यातच तिने बीचवरील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लिसासोबत तिचा नवरा आणि मुलगा झॅक दिसून येत आहे. यावेळी लिसाने स्विमसूट घातला आहे. मात्र या स्विमसूटमधून तिचं बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

Party of four on the way

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

“चौथा सदस्य लवकरच येणर असल्यामुळे त्या आनंदात पार्टी”, असं कॅप्शन देत लिसाने हा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे लिसा आता दुसऱ्यांदा आई होणार असून तिला यापूर्वी झॅक नावाचा एक लहान मुलगा आहे. झॅकच्या जन्मापूर्वीदेखील लिसाने सोशल मीडियावर असाच एक फोटो शेअर करत आई होणार असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, लिसाने डिनो लालवानीसोबत लग्न केलं आहे.लिसा आणि डिनोने कोणताही गाजावाजा न करता गुपचूप विवाह केला होता. त्यानंतर तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत ही माहिती साऱ्यांना दिली. डिनो हा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश उद्योजक गुल्लू लालवानी यांचा मुलगा असून २००८ साली त्याने बिनॅटोन टेलिकॉम या त्याच्या वडिलांच्या कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

First Published on August 18, 2019 12:31 pm

Web Title: lisa haydon announces second pregnancy with a beautiful family picture ssj 93
Next Stories
1 कौतुकास्पद! दिपाली सय्यद थाटणार पूरग्रस्त सांगलीतील १ हजार मुलींचा संसार
2 गुणवत्तेचा आग्रह वाढला!
3 ‘टीव्ही न करण्याचा सल्ला मिळाला होता’