News Flash

“असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस”, ट्रोल करणाऱ्या युजरची लिसा हेडनने केली बोलती बंद

नुकतेच लिसाने बेबी बंप फ्लॉन्ट करत बिकिनीमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते.

(photo-instagram@isahaydon)

अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन लवकरच तिसऱ्यांदा आई होणार आहे. जून महिन्यातच लिसाची प्रसूती होणार असल्याचं तिने नुकतच सोशल मीडियावर जाहीर केलं होतं. लिसा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून बेबी बंपमधील अनेक ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. नुकतेच लिसाने गरोदर असताना बिकिनीमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोवर कमेंट करत एका युजरने लिसाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र लिसाने या युजरला हटके उत्तर देताच युजरची बोलती बंद झाली आणि तिने लिसाचं कौतुक करण्यास सुरुवात केली.

लिसाने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यावर एका युजरने कमेंट केली. “असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस!! तुला सतत गरोदर राहणं आवडतं का?” अशी कमेंट युजरने लिसाच्या फोटोवर केली. यावर लिसा उत्तर देत म्हणाली, “हो मला आवडतं.. ही खूप खास वेळ आहे. मात्र हो आता अजून नाही. आता बाळाला जन्म दिल्यानंतर मी आयुष्यात पुढे जाण्याकडे लक्ष देणार आहे.” असं उत्तर लिसाने युजरला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

हे देखील वाचा: “मी दुसरा सुशांत सिंह राजपूत बनणार नाही “; केआरकेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

लिसाच्या या उत्तरानंतर मात्र युजरची बोलती बंद झाली आणि तिने लिसाचं कौतुक केलंय. ती म्हणाली, ” तुझ्याकडून हे ऐकून खूप मस्त वाटलं लिसा. तुझी फिगर खूपच आकर्षक आहे. गरोदरपणातील तुझे फोटो मला खूप आवडतात. तुला शुभेच्छा. काळजी घे आणि सुरक्षित रहा.” असं म्हणत युजरने लिसाच्या बेपी बंपमधील फोटोंना पसंती दिलीय.

lisa-haydon-lalwani-post (photo-instagram@isahaydon)

हे देखील वाचा: “लोक म्हणायचे मी काळी दिसते”; ‘द फॅमिली मॅन-२’ मधील अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात लिसाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. लिसाने २०१६ साली डीनो ललवानीसोबत लग्न केंल होतं. २०१७ मध्ये तिने पहिल्या मुलाला म्हणजेच जॅकला जन्म दिला. तर २०२० मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. लिसाच्या दुसऱ्या मुलाचं नाव लिओ असं आहे.

लिसाने ‘आयेशा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती वो ‘हाउसफुल 3’, ‘द शौकीन्स’, रास्कल्स, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ या सारख्या सिनेमांध्ये झळकली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 12:59 pm

Web Title: lisa haydon sassy replay to user who troll her on pregnancy photo said lisa pregnant all the time kpw 89
Next Stories
1 सनी लिओनीने पतीसह ‘लंदन ठुमकदा’ गाण्यावर लावले ठूमके; व्हिडीओ होतोय व्हायरल
2 “मी दुसरा सुशांत सिंह राजपूत बनणार नाही “; केआरकेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
3 “लोक म्हणायचे मी काळी दिसते”; ‘द फॅमिली मॅन-२’ मधील अभिनेत्रीने केला वर्णभेदाचा सामना
Just Now!
X