बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल लिसा हेडन सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टीव असते. सोशल मीडियावरुन नुकतीच लिसाने ती तिसऱ्यांदा आई होत असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा लिसाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दोन मुलांना जन्म दिल्यानंतरही लिसा अगदी फिट असून ती सोशल मीडियावर सतत तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

नुकताच लिसाने बेबी बंपसोबत एक धमाल व्हिडीओ आणि काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. लिसाने एका बेबी शॉवर पार्टीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. ही पार्टी चक्क जिममध्ये होत असल्याचं दिसतंय. तर लिसाच्या काही गरोदर मैत्रिणी तिच्यासोबत दिसत आहेत. या पार्टीत लिसाने बेबी बंपसोबत धमाल डान्स केल्याचं दिसतंय. मैत्रिणींसोबत डान्स एन्जॉय करताना ती दिसतेय. याच सोबत लिसाने जिममधले काही फोटोदेखील शेअर केले आहेत. यात ती वर्कआउट करताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

या व्हिडीओला लिसाने मजेशीर कॅप्शन दिलंय. “कदाचित नंतर हा व्हिडीओ डिलीट करेन. पण मी म्हणते की तुम्ही व्हिडीओ पहाच” असं म्हणत तिने पार्टी अरेंज केल्याबद्दल मैत्रिणीचे आभार मानले आहेत. लिसाच्या या धमाल व्हिडीओला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.

लिसा हेडन कायमच तिच्या फिटनेसकडे लक्ष देते. पहिल्या आणि दुसऱ्या गरोदरपणावेळी देखील लीसाची सर्वत्र चर्चा होती. दोन्हीवेळी लिसाने उत्तम आहारासोबत व्यायामाकडे लक्ष दिलं. व्यायाम आणि योगा करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. शिवाय तीसऱ्या प्रेग्नेंसीची बातमीदेखील खास पद्धतीने तिने चाहत्यांसोबत शेअर केली.