सोशल मीडियावर सेलिब्रिटी ट्रोल होताना नेहमीच दिसतात. मात्र, आता सेलिब्रिटींच्या मुलांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. लिसा हेडनने नुकताच एक प्रमोशन्ल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर तिच्या मुलांना शाप लागेल अशी कमेंट करत नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं आहे. तर लिसाने मुलांविषयी बोललेल्या त्या नेटकऱ्याला एका शब्दात उत्तर दिले आहे.

लिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रमोशन्ल व्हिडीओ आणि फोटो शेअर केले. ही जाहिरात एका सन प्रोटेक्शन क्रीमची आहे. “तुम्हाला आठवण करून देते की पावसाळ्यात जरी सुर्य आपल्यासोबत लपंडाव खेळत असला, तरीही तुम्ही सुर्यापासून स्वत: चे संरक्षण करायला विसरू नका,” असे कॅप्शन लिसाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon)

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! विक्रम बत्रा यांची प्रेयसी आजही आहे अविवाहीत

लिसाची ही जाहिरात पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केले आहे. ‘लिसा हेडन, रसायनांची विक्री करून लोकांचे आयुष्य उद्ववस्त करणे थांबवा. जर तू तुझ्या चाहत्यांना मुर्ख केलं तर तुझ्या मुलांना शाप लागेल,’ अशी कमेंट करत त्या नेटकऱ्याने लिसाला ट्रोल केलं. आपल्या मुलांविषयी कोणी असं बोलतं आहे हे पाहता लिसाने त्याला एका शब्दात उत्तर दिले आहे. लिसाने फक्त ‘व्वा’ म्हणत नेटकऱ्याला उत्तर दिले आहे.

lisa haydon troll
लिसाच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्याने तिच्या मुलांना आणि तिला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : रौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू यांना जमिनीवर बसून जेवताना पाहून आर माधवन म्हणाला…

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लिसाने तिच्या तिसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. लिसाने एक पोस्ट शेअर करत त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाल्याचं सांगितलं होतं. २०१६ मध्ये लिसाने बॉयफ्रेंड डिनो लालवानीशी लग्न केले. याआधी ते दोघे जवळपास १ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. लिसाने २०१७ मध्ये जॅक या तिच्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर २०२० मध्ये पुन्हा एकदा तिला मुलगा झाला असून आता तिला मुलगी झाली आहे.