News Flash

झी चित्रगौरव पुरस्कारामध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ ची बाजी; विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नाना पाटेकर यांना पुरस्कार देण्यात आला.

प्रत्येक पुरस्कारागणिक वाढत जाणारी उत्कंठा, भव्य दिव्य मंचावर सादर होणारे एकापेक्षा एक बहारदार कलाविष्कार, प्रेक्षकांमधून मिळणारी प्रचंड दाद, मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती, जीवनगौरव पुरस्कारावेळी भारावून गेलेल्या समस्त प्रेक्षकांनी दिेलेली मानवंदना अशा भारावून टाकणा-या वातावरणात झी चित्र गौरव २०१६ पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात मुंबईतील बांद्रा – कुर्ला संकुलाच्या मैदानावर पार पडला. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या बहुमानासह इतर अनेक पुरस्कारांवर ‘कट्यार काळजात घुसली’ने आपली ठसठशीत मोहोर उमटवली तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नाना पाटेकर आणि दिग्दर्शनासाठी महेश मांजरेकर या पुरस्कारांसहित इतरही मानाचे पुरस्कार पटकावित ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ चित्रपटानेही या पुरस्कारांवर आपली छाप सोडली. अतिशय दिमाखदार पद्धतीने रंगलेला झी चित्रगौरवचा हा सोहळा येत्या २० मार्चला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरून प्रेक्षेपित होणार आहे.

झी गौरव पुरस्कार २०१६ चित्रगौरव विजेते
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन –  महेश कुडाळकर (संदूक)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा – विक्रम गायकवाड (नटसम्राट असा नट होणे नाही)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – नचिकेत बर्वे, पूर्णिमा ओक (कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – उमेश जाधव – “धनक धनक” (उर्फी)
सर्वोत्कृष्ट संकलन – चारू श्री रॉय (डबल सीट)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – सुधीर पलसाने ( कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन – अनमोल भावे ( कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – संतोष मुळेकर ( कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट गीतकार – मंगेश कांगणे – “सूर निरागस हो” ( कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – आनंदी जोशी – किती सांगायचय मला (डबल सीट )
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – शंकर महादेवन (सूर निरागस हो)
सर्वोत्कृष्ट संगीतकार – शंकर- एहसान -लॉय (कट्यार काळजात घुसली )
सर्वोत्कृष्ट कथा – स्वप्ना वाघमारे जोशी (मितवा)
सर्वोत्कृष्ट पटकथा – प्रकाश कपाडिया (कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट संवाद – अभिजीत देशपांडे, किरण यज्ञोपवित (नटसम्राट असा नट होणे नाही)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे  (नटसम्राट असा नट होणे नाही)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विक्रम गोखले (नटसम्राट असा नट होणे नाही)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मुक्ता बर्वे (डबल सीट )
सर्वोत्कृष्ट अभिनेता – नाना पाटेकर (नटसम्राट असा नट होणे नाही)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – महेश मांजरेकर (नटसम्राट असा नट होणे नाही)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – कट्यार काळजात घुसली

विशेष ज्युरी पुरस्कार
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता – सचिन पिळगावकर ( कट्यार काळजात घुसली)
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – स्मिता तांबे (परतु)
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट गायक – राहूल देशपांडे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट गायक – महेश काळे ( कट्यार काळजात घुसली)
विशेष ज्युरी पुरस्कार सर्वोत्कृ्ष्ट दिग्दर्शन पदार्पण – सुबोध भावे ( कट्यार काळजात घुसली)
गार्नियर नॅचरल परफॉर्मर ऑफ दि इयर – अमृता खानविलकर ( कट्यार काळजात घुसली)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 4:14 pm

Web Title: list of zee chitragaurav award winners
Next Stories
1 पैसा झाला मोठा, ४० कोटींमुळे विराट आणि अनुष्काचा ब्रेकअप
2 जुना ‘पिजरा’ नव्याने!
3 ‘अपेक्षित असलेलंच पडद्यावर दिसेलच याची खात्री नसते’
Just Now!
X