News Flash

Video : ‘सोनू काका गूड बॉय आहेत’, चिमुकलीने मानले सोनू सूदचे आभार

व्हिडीओमधील तिचे बोबडे बोल ऐकून तुमच्या चेहऱ्यावर देखील हसू येईल.

Video : ‘सोनू काका गूड बॉय आहेत’, चिमुकलीने मानले सोनू सूदचे आभार

गेल्या काही दिवासांपूर्वी सोनू सूद अनेक मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यास मदत करत होता. त्यासाठी त्याने आणि त्याच्या संपूर्ण टीमने ट्विटरवर त्याचा फोन नंबर दिला होता. तसेच त्याने अनेक कामगारांना ट्विटरद्वारे मदत केली आहे. आता एका लहान मुलीने सोनू सूदचे आभार मानले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोनू सूदने केलेल्या कामामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत असतो. तसेच त्याच्या चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे दिसत आहे. सोनूने केलेल्या कामामुळे अनेक चाहते त्याचे आभार मानत आहेत. अशातच एका चिमुकलीने सोनू सूदने लोकांची मदत केल्यामुळे त्याला गूड बॉय म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये त्या चिमुकलीला तिची आई सोनू काका कोण आहे? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यावर त्या चिमुकलीने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली आहेत. ‘ज्यांच्या पायांना चटके बसतात त्यांना सोनू काका शूज आणून देतात. ज्यांना भूक लागते त्यांना सोनू काका जेवण आणून देतात. ज्यांना गावी जायचे आहे त्यांना गावी सोडतात. सोनू काका गूड बॉय आहेत’ असे तिने म्हटले आहे.

Video : सोनू सूदसमोर सर्वात मोठे आव्हान, चिमुकलीने केली अनोखी मागणी

या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून सोनूने देखील त्यावर उत्तर दिले आहे. त्याने, ‘लिटील एंजल, मी तुला घट्ट मीठी मारु शकतो का?’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2020 4:08 pm

Web Title: little girl says sonu sood is good boy video viral avb 95
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये वेळ जात नाही? पाहा ‘या’ पाच लोकप्रिय वेबसीरिज
2 ‘सत्तेत असलेल्यांनी प्राण्यांना न्याय मिळवून देण्याची गरज’; पूजा भट्ट संतापली
3 तुझ्या जाण्यानंतरही ‘ते’ असेच बहरतील; इरफानच्या आठवणीत पत्नीने शेअर केला खास फोटो
Just Now!
X