सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. यंदाच्या ऑस्करवर ‘पॅरासाइट’ या चित्रपटाने छाप पाडली. ऑस्करच्या अंतीम फेरीपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच दक्षिण कोरियन चित्रपट आहे. याव्यतिरीक्त अभिनेता जोकिन फिनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वात जास्त अपेक्षा जोकर या चित्रपटाकडून होत्या. कारण या चित्रपटाने सर्वाधिक ११ नामांकनं मिळवली होती. परंतु या चित्रपटाला केवळ दोन पुरस्कार पटकावता आले. त्या खालोखाल 1917 या चित्रपटाला १० नामांकने मिळाली होती. मात्र त्यांनाही केवळ दोनच पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.

 

 

Live Blog

10:02 (IST)10 Feb 2020
ऑस्करमध्ये दक्षिण कोरियाने सोडली छाप; 'पॅरासाइट' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

'पॅरासाइट' या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं कोरलं. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोंग जून हो यांनी केलं होतं. ऑस्कर पटकावणारा हा पहिलाच कोरियन चित्रपट आहे.

09:50 (IST)10 Feb 2020
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रेनी जेल्वेगर (जुडी)

अभिनेत्री रेनी जेल्वेगरने जुडी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

09:42 (IST)10 Feb 2020
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जोकीन फिनिक्स

अभिनेता जोकीन फिनिक्सला 'जोकर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. जोकीन फिनिक्सच्या अभिनय कारकिर्दीतील हा पहिलाच ऑस्कर आहे.

09:32 (IST)10 Feb 2020
‘ऑस्कर’मध्ये दक्षिण कोरियाचा दणका; पटकावला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचाही पुरस्कार

बोंग जून हो यांनी 'पॅरासाईट' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. यंदाच्या ऑस्करमध्ये या चित्रपटाला मिळालेला सलग तीसरा पुरस्कार आहे.

09:25 (IST)10 Feb 2020
ओरिजनल स्कोअर - जोकर

हिल्डर गुनाडोटिआर (Hildur Guðnadóttir) हिने ओरिजनल स्कोअर विभागात ऑस्कर पटकावला. जोकर हा यंदाच्या ऑस्करमधील सर्वाधिक नामांकनं मिळवणारा चित्रपट आहे. ओरिजनल स्कोअर या विभागातून जोकरने पुरस्कारांचे खाते उघडले.

09:02 (IST)10 Feb 2020
इंटरनॅशनल फिचर फिल्म - पॅरासाईट

पॅरासाईट या चित्रपटाने 'इंटरनॅशनल फिचर फिल्म' या विभागात ऑस्कर पटकावला आहे. ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा हा पहिलाच कोरियन चित्रपट आहे. आणि पहिल्याच वर्षात त्यांनी ऑस्करवर आपले नाव कोरले.

08:54 (IST)10 Feb 2020
व्हिज्युअल इफेक्ट - 1917

जॉर्ज बटलर आणि डॉमनिक ट्यूई यांना 1917 या चित्रपटासाठी व्हिज्युअल इफेक्ट विभागात ऑस्कर मिळाला आहे.

08:30 (IST)10 Feb 2020
बेस्ट सिनेमॅटोग्राफी - १९१७

रॉजर डिकेंस यांना '१९१७' या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफी या विभागात ऑस्कर मिळाला आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हे १५ नामांकन होते. आणि दुसरा ऑस्कर पुरस्कार होता.

08:21 (IST)10 Feb 2020
बेस्ट साऊंड मिक्सिंग - १९१७

मार्क टेलर आणि स्टुअर्ट विल्सन यांनी बेस्ट साऊंड मिक्सिंग विभागातील ऑस्कर पटकावला. त्यांच्या कारकिर्दितील हे पहिलेच नामांकन होते आणि पहिल्याच फटक्यात त्यांनी ऑस्करवर आपलं नाव कोरलं.

08:17 (IST)10 Feb 2020
बेस्ट साऊंड एडिटिंग - फोर्ड व्हर्सेस फरारी

डोनाल्ड सिल्वेस्टर याने बेस्ट साऊंड एडिटिंग विभागातील ऑस्कर पटकावला. त्याच्या कारकिर्दितील हा पहिलाच ऑस्कर आहे.

07:56 (IST)10 Feb 2020
लॉरा डर्न - सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

अभिनेत्री लॉरा डर्न हिने 'मॅरेज स्टोरी' या चित्रपटातील अभिनयासाठी ऑस्कर पटकावला.

07:48 (IST)10 Feb 2020
बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर - अमेरिकन फॅक्टरी

स्टिव्हन बोगनर दिग्दर्शित 'अमेरिकन फॅक्टरी' हा चित्रपट वर्षातीस सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म ठरला आहे. स्टिव्हनने पहिल्याच नॉमिनेशनमध्ये ऑस्कर पटकावला आहे.

07:43 (IST)10 Feb 2020
जॅकलिन ड्युरान ठरली वर्षातील सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार

'लिटिल वूमन' या चित्रपटातील वेशभूषेसाठी जॅकलिन ड्युरान ऑस्कर मिळाला आहे.

07:29 (IST)10 Feb 2020
हेअर लव्ह सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

मॅथ्यू चेरीने पटकावला ऑस्कर. हेअर लव्ह या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

07:15 (IST)10 Feb 2020
'पॅरासाईट'ने ठरला पटकावला ओरिजनल स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर

पॅरासाईट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर मिळाला. ऑस्कर मिळवणारा हा पहिला दक्षिण कोरियन चित्रपट आहे.

07:02 (IST)10 Feb 2020
टॉय स्टोरी 4 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड मूव्ही

जोश कूली दुग्दर्शित टॉय स्टोरी 4 ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट.

06:52 (IST)10 Feb 2020
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ब्रॅड पीट्स

ब्रॅड पीट्सने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला.  ‘वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी हा पुरस्कार त्याला मिळाला.

06:43 (IST)10 Feb 2020
ऑस्कर सोहळ्याला सुरुवात

प्रसिद्ध पॉप सिंगर जेनेल मोनेच्या 'इट्स ब्यूटिफूल डे इन द नेबरहूड' या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली.

06:25 (IST)10 Feb 2020
जेसन डेरुलोचा अपघात

प्रसिद्ध अमेरिकन पॉपसिंगर ऑस्कर सभागृहाच्या पायऱ्या चढताना पाय घसरुन पडला. त्याला आता प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

06:20 (IST)10 Feb 2020
'जोकर' फेम जोकीन फिनिक्सची धमाकेदार एंट्री

ऑस्करमधील सर्वाधिक चर्चेत असलेला जोकीन फिनिक्सचे ऑस्करमध्ये आगमन. जोकीन फिनिक्सच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणार असे म्हटले जात आहे.

06:10 (IST)10 Feb 2020
Oscars Top 10 Facts : विजेता ४५ सेकंदापेक्षा अधिक बोलूच शकत नाही

ऑस्कर विजेत्यांनी पुरस्कार सोहळ्यात ४५ सेकंदांपेक्षा जास्त काळ भाषण देऊ नये असा नवा नियम २०१० मध्ये लागू करण्यात आला होता.

06:02 (IST)10 Feb 2020
ज्युलियाची सँडविच पोझ

'वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड' या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्युलिया बटरने सँडविच पोझ दिली. आपल्या पाकिटातले सँटविच दाखवून तिने फोटो काढले. हा विचित्र प्रकार पाहून एकच हास्यकल्लोळ झाला.

05:57 (IST)10 Feb 2020
सुपरहिरो हल्कचे रेड कार्पेटवर आगमन

मार्व्हल चित्रपटांमध्ये हल्क या सुपरहिरोची भूमिका साकारणारा अभिनेता मार्क रफेलोचे ऑस्कर सोहळ्यात आगमन झालं आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून तो ओळखला जातो.

05:29 (IST)10 Feb 2020
रोमन ग्रिफीन आणि आर्ची येट्स

रोमन आणि आर्ची हे दोन्ही बालकलाकार 'जो जो रॅबिट्स' या चित्रपटात झळकले होते. त्यांच्या अभिनयाची जगभरातील चित्रपट समिक्षकांनी स्तुती केली होती. 'जो जो रॅबिट्स' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळालं आहे.

05:23 (IST)10 Feb 2020
'ऑस्कर'चं रेड कार्पेट टाकायला लागले तब्बल ९०० तास

‘रेड कार्पेट सेलिब्रेशन’साठी तब्बल ५० हजार चौरसफुटांची लाल सतरंजी वापरली गेली आहे. या सतरंजीवर जवळपास २० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. तसेच ही लाल सतरंजी अंथरण्यासाठी १८ कामगारांना तब्बल ९०० तास लागले.

05:17 (IST)10 Feb 2020
'ऑस्कर'चं रेड कार्पेट टाकायला लागले तब्बल ९०० तास

‘ऑस्कर’ सोहळ्याची खरी सुरुवात होते ती रेड कारपेट पासून. या सोहळ्याला निमंत्रीत केलेल्या सर्व पाहुण्यांच्या स्वागतासाठी लाल रंगाची एक सतरंजी अंथरली जाते. या प्रकाराला ‘रेड कार्पेट सेलिब्रेशन’ असं म्हणतात. आमंत्रित पाहुणे या लाल सतरंजीवरुन सभागृहात जातात. त्यावेळी त्यांचे फोटो सेशल देखील केले जाते.

05:13 (IST)10 Feb 2020
केटलिन डेव्हरचा इकोफ्रेंडली ड्रेस

बूक्समार्ट चित्रपटातील मुख्य अभिनेत्री केटलिन डेव्हरने लाल रंगाचा इकोफ्रेंडली ड्रेस परिधान केला आहे.

05:03 (IST)10 Feb 2020
‘पॅरासाइट’ चित्रपटाच्या टीमचं रेड कार्पेटवर आगमन

‘पॅरासाइट’ हा एक दक्षिण कोरियन चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते बोंग जून हो यांच्यासह संपूर्ण टीमचे आगमन झाले आहे.