23 November 2020

News Flash

हेलन- सलीम खान यांची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

खरं तर मी त्यांच्या प्रेमात नेमकं कधी पडले हे निश्चितपणे सांगू शकत नाही, पण...

सध्याच्या काळात आयटम साँग्स आता नवीन राहिलेले नाहीत. हिंदीबरोबरच आता मराठी चित्रपटांमध्येदेखील आयटम साँग पाहायला मिळतात. मात्र, कलाविश्वात या आयटम साँग किंवा डान्सची जर का कोणी सुरुवात केली असेल तरी ती म्हणजे अभिनेत्री हेलन यांनी. वयाच्या१९ व्या वर्षात हेलन यांनी हावडा ब्रीज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील त्यांचं मेरा नाम चिन चिन चू हे गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. या गाण्यानंतर हेलन हे नाव प्रचंड चर्चिलं जाऊ लागलं. आपल्या नृत्यामुळे आणि अदाकारीमुळे हेलन यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच. विशेष म्हणजे त्यांच्या सौंदर्यावर व नृत्यावर सलीम खानदेखील घायाळ झाले. त्यामुळेच आज हेलन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची व सलीम खान यांची हटके लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

एका मुलाखतीत हेलन यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली होती. “सलीम खान यांचा स्वभाव इतरांपेक्षा वेगळा होता. त्यांचे विचार, बोलण्याची पद्धत इतरांसारखी नव्हती. ते निस्वार्थ मनाने कायम माझी मदत करायचे. खरं तर मी त्यांच्या प्रेमात नेमकं कधी पडले हे निश्चितपणे सांगू शकत नाही. पण, बराच काळ एकमेकांची साथ दिल्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आणि १९८० मध्ये लग्न केलं”, असं हेलन यांनी सांगितलं.

पुढे त्या म्हणतात, “खरं तर एका विवाहित पुरुषासोबत लग्न करणं मला पटलं नव्हतं. माझ्यामुळे त्यांची पत्नी व मुलं त्यांच्यापासून दुरावत होती या गोष्टीची गोष्टीची खंत जाणवत होती. त्यावेळी सलमान १५ वर्षांचा होता त्यामुळे नेमकं काय घडतंय हे त्याला समजत होतं. सुरुवातीचे दिवस कठीण गेले. मात्र, सलमानने हळूहळू आई म्हणून माझा स्वीकार केला. त्यामुळेच आज मी सलीम यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे”.

दरम्यान, हेलन यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी सलीम खान यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी सलीम खान ४५ वर्षांचे होते. हेलन यांचं हे दुसरं लग्न असून त्यांनी १९५७ मध्ये दिग्दर्शक पी.एन. अरोरा यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला. तर सलीम खान यांचं पहिलं लग्न सुशीला चरक यांच्यांसोबत झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 10:53 am

Web Title: lobe story of helen and salim khan dcp 98
Next Stories
1 ‘मुळशीचा पॅटर्न’चा दरारा पुन्हा एकदा; चित्रपटगृहांमध्ये घुमणार ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘चा आवाज
2 करण जोहरने चित्रपटाच्या नावाची केली कॉपी; मधुर भांडारकरांचा आरोप
3 “माझ्याकडे सलमानचा नंबर नाही”; बेरोजगार अभिनेता मागतोय काम
Just Now!
X