aamirkhan759

गेले काही दिवस आमिर खान लुधियानामध्ये ‘दंगल’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून, शहरातील कुस्तीच्या आखाड्यांनादेखील तो भेट देत आहे. चित्रपटात एका कुस्तीपटूची भूमिका साकारत असलेल्या आमिरला शुटिंगदरम्यान स्थानिक कुस्तीपटूंनी सोन्याची गदा भेट म्हणून दिली. स्थानिक कुस्तीपटूंना चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली असता दिवसभराचे चित्रीकरण संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन आमिरला सोन्याची गदा भेट दिल्याचे चित्रपटाच्या प्रवक्त्याने सांगितले. मारुती हे कुस्तीपटूंचे दैवत असून, ती शक्तिची देवता असल्याने गदा ही आमिरसाठी योग्य भेटवस्तू असल्याची कुस्तीपटूंची भावना हेती. महान कुस्तीपटू महाविर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.