28 May 2020

News Flash

उर्मिला धनगर यांच्या गाण्याने ‘लोच्या ऑनलाईन’चा मुहूर्त संपन्न

शुबीर मुखर्जी प्रस्तुत क्षितीज मोशन पिक्चर्स निर्मित 'लोच्या ऑनलाईन' या रमेश चव्हाण दिग्दर्शित चित्रपटाचा मुहूर्त अंधेरीच्या एल.एम स्टुडियोत नुकताच एका भन्नाट गाण्याच्या ध्वनिमुद्रनाने झाला.

| April 17, 2015 01:59 am

शुबीर मुखर्जी प्रस्तुत क्षितीज मोशन पिक्चर्स निर्मित ‘लोच्या ऑनलाईन’ या रमेश चव्हाण दिग्दर्शित चित्रपटाचा मुहूर्त अंधेरीच्या एल.एम स्टुडियोत नुकताच एका भन्नाट  गाण्याच्या ध्वनिमुद्रनाने झाला. दुनियादारी आणि टाइमपास २ चे गीतकार मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला ‘का रे दुरावा’ फेम आघाडीचे संगीतकार ए.व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केले असून सारेगमप संगीत स्पर्धेतून महागायिका बनलेल्या उर्मिला धनगर  यांचा  वेगळ्या धाटणीचा ठसकेदार,खडा आवाज या गीताला लाभला आहे.
माणसे सतत ऑनलाईन असणे हे सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळाचे ठळक वैशिष्ट्य आहे,माहितीची देवाणघेवाण,जगणे सोप्पे होणे,हे तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी तरुण पिढी या सतत ऑनलाईनच्या जंजाळात अनेक मोहांना बळी पडते,या आभासी दुनियेत स्वत:ला हरवून बसते.नव्या पिढीच्या रोजच्या जगण्यात माहिती तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणार्या समस्यांची जाणींव एका उत्कंठावर्धक कथेच्या माध्यमातून या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
रुपेश सोनार निर्मित  ‘लोच्या ऑनलाईन’ ची कथा-पटकथा -दिग्दर्शन रमेश चव्हाण यांचे असून सवांद शरद जोशी यांचे आहेत तर छायाचित्रणाची बाजू अरविंद पुवार यांनी सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 1:59 am

Web Title: lochya online movie muhurt
टॅग Marathi Movie
Next Stories
1 अनाथ मुलीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ‘डॉटर’
2 मराठी सिनेइंडस्ट्री लवकरच ८०० कोटींचा पल्ला गाठेल
3 दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर
Just Now!
X