बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून दिशा पटानीकडे पाहिलं जातं. ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’, ‘बागी 2’, ‘मलंग’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिशाने कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र सध्या लॉकडाउनचा काळ सुरु असल्यामुळे दिशा वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे. त्यामुळे दिशा तिच्या आगामी चित्रपटांची तयारी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

बऱ्याच दिवसापासून घरात राहून कंटाळलेली दिशा तिच्या पुढील प्रोजेक्ट्सकडे वळली आहे. या काळात घरात राहून ती ऑनलाइन पटकथा वाचन (स्क्रीप्ट नरेशन) करत आहे. त्यामुळे सध्या तिचा वेळही जात आहे आणि घरी राहून कामदेखील होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on


दिशा अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचत आहे. त्यामुळे लवकरच ती एखादा चित्रपट फायनल करेल असं सांगण्यात येत आहे. त्यातच सध्याचा काळ डिजिटलचा असल्यामुळे ती व्हर्चुअल मिटींग करुन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधत आहे.

दरम्यान, दिशा लवकरच ‘राधे’ या चित्रपटात झळकणार आहे. लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतर ती चित्रपटाच्या उर्वरित चित्रीकरणाकडे वळणार आहे. तसंच ती ‘एक व्हिलेन 2’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सूरी करत आहेत.