केंद्र सरकारने मागच्या आठवड्यात अनलॉक 1.0 जाहीर केला. यात मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसंच पहिल्या टप्प्यात चित्रपगृहदेखील सुरु होणार नसल्यामुळे प्रेक्षकांना घरात बसूनचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबसीरिज पहावं लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचा नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, एम.एक्स, प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉमकडे कल वाढला आहे.

लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांचा वाढलेला कल पाहून ओटीटी प्लॅटफॉर्मही प्रेक्षकांसाठी खास चित्रपट आणि वेबसीरिज घेऊन येत आहेत. तसंच काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटांचा, वेबसीरिजचा धमाका सुरु आहे. यातच एम.एक्स. प्लेअरने प्रेक्षकांसाठी खास पाच वेबसीरिजचा दाखविण्यात येणार आहेत.
१. समांतर –
समांतर या सीरिजच्या माध्यमातून अभिनेता स्वप्नील जोशीने पहिल्यांदाच वेबविश्वात पदार्पण केलं. या सीरिजमध्ये त्याने सुदर्शन चक्रपाणी ही भूमिका साकारली आहे. ही सीरिज ९ भागांची असून यात अभिनेत्री तेजस्विनी पंडितही झळकली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे.
२. आणि काय हवं (१ आणि २) –
आणि काय हवं या सीरिजचे दोन सिझन आहेत. या दोन्ही सिझनमध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत झळकले आहेत. या सीरिजचे दोन्ही भाग कमी कालावधीत लोकप्रिय झाले. या सीरिजचं दिग्दर्शन वरुन नार्वेकर यांनी केलं आहे.

३. भूताटलेला –
शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित भूतालेला ही सीरिज ५ भागांची आहे. या सीरिजच्या माध्यमातून प्रियदर्शन जाधव याने वेबविश्वात पदार्पण केलं आहे. यात त्याच्यासोबत जय मल्हारफेम अभिनेत्री सुरभी हांडेने स्क्रीन शेअर केली आहे. हॉरर कॉमेडी प्रकारात मोडणारी ही सीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली आहे.

४. एक थी बेगम –
सचिन दरेकर दिग्दर्शित एक थी बेगम ही सूडकथा असून यात अभिनेत्री अनुजा साठेने मुख्य भूमिका साकारली आहे. ही सीरिज सत्यघटनेवरुन प्रेरित होऊन तयार करण्यात आली आहे. यात अनुजासह चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिसाटकर, अभिजीत चव्हाण, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, नाझर खान, विजय निकम, अनिल नगरकर, सुचित जाधव, राजू आठवले आणि संतोष जुवेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

५. पांडू –
ही सीरिज मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित आहे. पोलिसांसमोर दररोज येणारी नवीन आव्हाने, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि नोकरीतील गुंतागुंत यावर या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलं आहे. यात सीरिजमध्ये सुहास सिरसाट, दीपक शिर्के आणि तृप्ती खामकर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.