|| रेश्मा राईकवार

गेल्या वर्षी टाळेबंदीच्या काळात रहस्यमय कथा आणि वेगळी धाटणी असलेली ‘समांतर’ ही वेबमालिका एमएक्स प्लेअर या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झाली. सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांनी साकारलेल्या कु मार महाजनची कथा अनेकांना आवडली. याच वेबमालिके चे दुसरे पर्व ‘समांतर २’ या नावाने १ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या पर्वातही कु मार आणि चक्रपाणी यांच्यातला पाठशिवणीचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या पर्वाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी के ले आहे. ‘समांतर’ हा आपल्या कारकीर्दीतला आजवरचा वेगळा अनुभव आहे, असे सांगणाऱ्या स्वप्निलने या दोन्ही पर्वात काम करतानाचा अनुभव, दोन ताकदीच्या दिग्दर्शकांबरोबर या एका वेबमालिके वर के लेले काम आणि सद्य परिस्थितीत कलाकार म्हणून समोर असलेली आव्हानं अशा विविध विषयांवर गप्पा मारल्या.

‘समांतर’ची कथा ज्या क्षणाला संपली, अगदी त्या क्षणापासून ‘समांतर २’ची कथा सुरू होते, असे स्वप्निल सांगतो. सध्या वेबमालिके तून प्रीक्वल किं वा सिक्वल रंगवण्याचा ट्रेण्ड आहे, पण ‘समांतर’च्या बाबतीत मागचं-पुढचं असं काही नाही. गेल्या पर्वात कु मारच्या आयुष्यात एक स्त्री येते, या वळणावर वेबमालिका थांबली होती, आता तेच वळण घेऊन कथा पुढे नेण्यात आली आहे, असं तो सांगतो. या दोन्ही पर्वांचे दिग्दर्शन सतीश राजवाडे आणि समीर विद्वांस अशा दोन मातब्बर दिग्दर्शकांनी के ले आहे. या दोघांबरोबर एका वेबमालिके वर काम करतानाचा अनुभव सांगताना दोघांनीही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न के ला असल्याचे स्वप्निलने स्पष्ट के ले. ‘सतीश आणि समीर दोघेही मराठीतील कमाल दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना खरोखरच मजा येते. सतीशबरोबर मी खूप काम के लं आहे, त्यामुळे आमच्यात एक घट्ट नातं आहे. काम करताना एक मोकळेपणा आहे. समीरबरोबर पहिल्यांदाच काम के लं, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडा जोर देऊन काम के लं, पण त्याचा फायदा आम्हाला जास्त झाला. दिग्दर्शक म्हणून दोघांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. दोघंही जीव ओतून आणि कथेला न्याय देत दिग्दर्शन करतात. त्यामुळे ही वेबमालिका पुढे नेताना काही तरी वेगळंच करतो आहे असं वाटलं नाही’, हे सांगतानाच वेबमालिके च्या वेगवेगळ्या पर्वांसाठी वेगवेगळे दिग्दर्शक हे या ओटीटी माध्यमाचे स्वरूपच असल्याचे त्याने स्पष्ट के ले.

‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचेही तीन पर्व झाले. या तिन्ही पर्वात स्वप्निलने त्याची गौतमची व्यक्तिरेखा पुढे नेली. मात्र ‘समांतर २’साठी कु मार महाजनची व्यक्तिरेखा पुढे नेणं हे खूप आव्हानात्मक होतं, असं तो म्हणतो. गौतम ही साधीसरळ व्यक्तिरेखा होती, तो आपल्या आजुबाजूला दिसणाऱ्या तरुणांसारखाच आहे. त्यामुळे मध्ये काही काळ गेला तरी मला गौतमचा सूर जसा आहे तसा पकडणं सहजशक्य झालं होतं. गौतम काहीसा माझ्यासारखाच असल्याने ते सोपं होतं, पण कु मार अजिबात माझ्यासारखा नाही. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अनाकलनीय आहेत. त्यामुळे कु मारची गोष्ट जिथे थांबली तिथून त्याचा तसाच सूर पकडत पुन्हा तो साकारणं हा अनुभव मला खूप काही शिकवणारा होता, असं तो सांगतो. मराठीत दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडून सातत्याने आशयमांडणीत बदल के ले जात आहेत. ‘समांतर’सारखी वेबमालिका आणतानाही वेगळेपणाचा हा प्रयत्न जाणवल्याशिवाय राहात नाही, याबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि कलाकार दोघांनाही सातत्याने स्वत:त बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असं त्याने सांगितलं. प्रत्येक कलाकृतीनुरूप तुम्ही प्रगल्भ होत गेला नाहीत तर तुमचे काम तिथेच थांबेल. काळानुरूप स्वत:ला बदलवत जे पुढे गेले तेच टिकू न राहिले आहेत, असे तो म्हणतो.

कलाकार म्हणून तर आत्ताच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देणं हे अधिक अवघड होतं आहे, असं तो सांगतो. अजून काही काळ आजुबाजूची परिस्थिती बदलायला जावा लागणार आहे. या काळात प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात टिकू न राहणं गरजेचं आहे. त्यासाठी चित्रपट, वेबमालिका किं वा मालिका कु ठलेही माध्यम असो त्यात जे बदल होत आहेत त्याच्याशी जुळवणूक करत पुढे गेलं पाहिजे. ते बदल आत्मसात करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही, असं तो म्हणतो. अर्थात, चित्रीकरणावर आलेले निर्बंध, इतर कामांवरची बंधनं यात आपलं काम कु ठेच थांबलेलं नाही, याबद्दलही त्याने आनंद व्यक्त के ला. मी याआधीही वर्षाला एक किं वा दोन चित्रपट करत होतो. आत्ताही या दोन वर्षांत ‘समांतर’चे दोन पर्व के लेत. काही ना काही काम निर्मितीच्या स्तरावर, दिग्दर्शन किं वा पोस्ट प्रॉडक्शनच्या स्तरावर कु ठे ना कु ठे सुरू आहे. पण आता करोनामुळे नियम अधिक कडक झाले असल्याने त्याबद्दल फारशी वाच्यता सहजपणे करता येत नाही, असं त्याने सांगितलं. आत्ता ज्यांच्याकडे मनाला समाधान देईल असे काम करण्याची संधी आहे ते खरंच भाग्यवान आहेत, असं तो म्हणतो. सध्या निर्बंधांमुळे हातात वेळ आहे, पण या वेळेचा सदुपयोग अभिनयाच्या बाबतीतच करण्यावर आपला भर असल्याचे तो सांगतो. मला जेव्हा एखादी गोष्ट लेखक म्हणून सांगावीशी वाटेल तेव्हा मी लेखन करेन किं वा दिग्दर्शक म्हणून मीच ते मांडलं पाहिजे असं वाटेल तेव्हा दिग्दर्शन करेन. मात्र अभिनयापलीकडे जात आत्ताच या गोष्टी करण्याची घाई आपल्याला नाही, असंही तो सांगतो. ‘समांतर २’नंतर काय?, याचंही उत्तर लवकरच मिळेल असं त्याने सांगितलं.