22 September 2020

News Flash

वीकेंडला रंगणार ‘मधुरव फिनाले फेस्टिव्हल’

'मधुरव'मधून अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रेक्षकांच्या भेटीला आली

मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण घरात अडकला आहे. मात्र या काळात चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि त्यांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होते. या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत होते. यात मराठी कलाकाही कुठेच मागे नव्हते. अनेक जण इन्स्टाग्राम, फेसबुकवरुन रोज प्रेक्षकांची भेट घेत होते. यामध्ये अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम हिनेदेखील ‘मधुरव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांची भेट घेत होती.

मधुरा वेलणकर-साटमने १७ एप्रिल रोजी ‘मधुरव’ या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. फेसबुकच्या माध्यमातून तिने हा कार्यक्रम सुरु केला होता. परंतु १७ यशस्वी भागांनंतर आता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन सुरु झालेल्या या कार्यक्रमाती सांगतादेखील त्याच पद्धतीने होणार आहे.

या सांगता सोहळ्याला मधुराने ‘मधुरव सांगता सोहळा’ किंवा ‘मधुरव फिनाले फेस्टिव्हल’ असं नाव दिलं असून या कार्यक्रमात दिग्गज व्यक्ती प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. हा सोहळा येत्या शुक्रवार ते रविवार म्हणजे १० जून ते २१ जून या तीन दिवसात होणार आहे. या तीनही दिवशी मान्यवर व्यक्ती प्रेक्षकांची भेट घेतली.

मधुराने सुरु केलेला मधुरव हा कार्यक्रम दर शुक्रवार आणि रविवार अशा दोन दिवशी संध्याकाळी ६ वाजता सुरु व्हायचा. या कार्यक्रमात मधुरा फेसुबक लाइव्हच्या माध्यमातून वेगवेगळ्या साहित्य कृतींचं वाचन करत असून ज्या लेखकाची साहित्यकृती मधुरा वाचायची, त्या लेखकांची आणि प्रेक्षकांची फेसबुक लाइव्हच्याच माध्यमातून भेटही घडवून देत होती. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, डिजिटल मीडियावर आगळा वेगळा उपक्रम म्हणून “मधुरव” नावाजला जात आहे. “मधुरा वेलणकर साटम” या युट्युब चॅनेल वर देखील हे सगळे १७ भाग आणि सांगता कार्यक्रम उपलब्ध होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 5:51 pm

Web Title: lockdown special show marathi actress madhura velankar show madhuravv grand finale ssj 93
Next Stories
1 मनोबल वाढवणारा ‘तू चल पुढं’ फिल्म फेस्टिव्हल
2 श्रीयुत गंगाधर टिपरेंची नात शलाका सध्या काय करते?
3 “टॅलेंटेड लोकांना पाठिंबा द्यायचा असेल तर…”; बुवनचा घराणेशाहीला विरोध करणाऱ्यांना सल्ला
Just Now!
X