13 August 2020

News Flash

लॉकडाउनमध्येच ‘वैजू नंबर १’ मालिकेतल्या अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ

'दिली दोस्ती दुनियादारी' मालिकेत साकारली होती भूमिका

अभिनेत्री सुवेधा देसाईने बांधली लग्नगाठ

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘वैजू नंबर १’ या मालिकेतील अभिनेत्रीने लॉकडाउनमध्येच लग्नगाठ बांधली आहे. सुवेधा देसाई असं या अभिनेत्रीचं नाव असून १ जून रोजी सागर गावकरशी तिने लग्न केलंय. लग्नसमारंभासाठी जोडप्याने प्रशासनाकडून योग्य ती परवानगी घेतली आणि त्यानंतर निवडक कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

सुवेधा व सागरने लग्नाच्या सर्व विधी मास्क घालून पूर्ण केल्या. उपस्थितांनाही त्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन केलं. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला. लॉकडाउननंतर मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : टीव्ही अभिनेत्रीसह कुटुंबातील सात जणांना करोनाची लागण

सुवेधाने ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेत किंजलची भूमिका साकारली होती. सध्या ती ‘वैजू नंबर १’मध्ये दाक्षिणात्य मुलीची भूमिका साकारतेय. तर सागर गावकर हा दिग्दर्शक व लेखक आहे. ‘सुवासिनी’ या लोकप्रिय मालिकेचं दिग्दर्शन सागरने केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 1:26 pm

Web Title: lockdown wedding vaiju no 1 actress suvedha desai ties the knot see pics ssv 92
Next Stories
1 ‘पाताल लोक’ आणि ‘सेक्रेड गेम्स’च्या तुलनेबाबत अनुष्का शर्मा म्हणते…
2 दुसऱ्या मुलासाठी ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला घातली होती ही अट
3 भावा-बहिणाचा डान्स करतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली..
Just Now!
X