20 November 2019

News Flash

मोदींच्या विजयावर बॉलिवूड कलाकार म्हणाले..

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. ५४२ मतदारसंघापैकी भाजपा तब्बल ३०० मतदारसंघांमध्ये आघाडीवर असून काँग्रेस ५० जागांवर आघाडीवर आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण असताना सर्वच स्तरातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीही मोदींना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

‘तुम्ही करून दाखवलंत,’ असं म्हणत साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्विटद्वारे मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

दिग्दर्शक मधुर भांडारकरने मोदींसोबतचा फोटो शेअर शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना या विजयाच्या शुभेच्छा,’ असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं.

Just Now!
X