कलाविश्वातील लेखन क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणजे क्षितिज पटवर्धन. कमी वयात नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा अनेक भूमिकांमधून क्षितिज प्रेक्षकांसमोर आला आहे. अलिकडेच त्याने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर भाष्य केलं असून मराठी कलाविश्वातील कंपूशाहीविषयी तो बेधडकपणे व्यक्त झाला आहे.
दरम्यान, या मुलाखतीत त्याने अनेक विषयांवर चर्चा केली. तसंच कलाविश्वात कोणते बदल होणं अपेक्षित आहेत. लेखकांना मिळणार मानधन आणि अन्य विविधविषयांवर त्याचं मत व्यक्त केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 11:58 am