महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि ‘सुखकर्ता आणि दु:खहर्ता’ असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन २९ ऑगस्ट रोजी होत आहे. या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा २०१४’ला गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रोज मुंबई व उपनगराच्या कानाकोपऱ्यातील नामांकित मंडळांकडून स्पर्धेतील सहभागासाठीच्या प्रवेशिका दाखल होत आहेत. या स्पर्धेत सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास ‘मुंबईचा राजा’ हा बहुमान मिळणार आहे. विजेत्या गणेशोत्सव मंडळाला ५१,००१ रुपयांचा भव्य पुरस्कार दिला जाणार आहे.
स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘वीणा वल्र्ड’ असून ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ (एलआयसी) यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेत अलेन हेल्थकेअर, रेड एफएम ९३.५ हे सहप्रायोजक तर ‘डीएनस बँक’ हे बॅंकिंग पार्टनर आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी असलेल्या या स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्टपासून उपलब्ध होताच गणेश मंडळांकडून प्रतिसाद मिळू लागला. दक्षिण मुंबईपासून ते उपनगरातील ठिकठिकाणच्या गणेश मंडळांनी या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. प्रवेशिका मिळण्याची अंतिम मुदत सोमवार २५ ऑगस्टपर्यंत आहे. तर प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख मंगळवार, २६ ऑगस्ट आहे. कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई या विभागात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
*भरपूर बक्षिसे
स्पर्धेत एकूण २६ पारितोषिके आणि ४४ सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. पर्यावरणस्नेही सजावटीसाठी १५ हजार १ रुपयांचे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक विभागासाठी १५ हजार एक रुपयांचे विशेष पारितोषिकही दिले जाणार असून सवरेत्कृष्ट मूर्तीकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखक या वैयक्तिक विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दोन हजार ५०१ रुपये रोख, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.
*लघुसंदेश स्पर्धा
भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशाच्या माध्यमातूनही सवरेत्कृष्ट मूर्ती ठरविण्यात येणार असून त्याचा निर्णय वाचकांनी पाठविलेल्या लघुसंदेशाव्दारे घेण्यात येणार आहे. विजेत्या एका मंडळास सन्मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे.
*निवडीचे निकष
पारितोषिकासाठी मंडळाची निवड करताना सवरेत्कृष्ट मूर्तीकार, कला दिग्दर्शक, संहिता लेखन, उत्कृष्ट मूर्ती, आरास, कला दिग्दर्शन, देखाव्याची कल्पना आदींसह जागतिक, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवरील जनजागृती, पारंपरिकता, उच्च कला अभिरुची, पर्यावरण, मंडळाने वर्षभरात केलेले सामाजिक काम/उपक्रम, गणेशमूर्ती देखावा, विषयाची निवड, देखाव्यातील व्यक्तिरेखांच्या उंचीचे मोजमाप, चलचित्रांच्या हालचाली, प्रकाशयोजना, सजावटीचा विषय, मंडळाकडून ठेवली जाणारी स्वच्छता, कार्यकर्त्यांमधील शिस्त, ध्वनिवर्धकाचा आवाज या गोष्टींचा विचार केला जाणार आहे.
प्रवेशिका मिळण्याची ठिकाणे
*मुंबई-लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, दुसरा मजला, नरिमान पॉइंट. (दूरध्वनी-६७४४ ०३ ४७/६७४४ ०३ ६९) धर्मेश म्हसकर-९७७३ १५४ ९२४.
*ठाणे (पश्चिम)- लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, कॉसमॉस बॅंकेच्या वर, गोखले मार्ग, नौपाडा. अविश कदम-९८२० २०२ ९६६ / सचिन शेळके-९६९९ ५६३ ४३४.
*डोंबिवली (पूर्व) सप्तशती ज्वेलर्स, मंदार न्यूज पेपर्स एजन्सी, कस्तुरी प्लाझा, मानपाडा रस्ता, योगेश मोरे- ९३२२ ९०६ ५०९.
*कल्याण (पश्चिम), बुधकर पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड, भुपेंद्र, ६-१, पहिला मजला, शिवाजी पथ, महालक्ष्मी हॉटेलच्यावर.सुरेश ठाकूर-९३२२ ९०६ ५०५.
*नवी मुंबई-अनंत वाकचौरे-९३२२ ९०६ ५०६ / नितीन माने-९८१९ ३९६ ६४४. (प्रवेशिका मिळण्याची वेळ- सकाळी १०.३० ते सायंकाळी ५)