‘लोकसत्ता लोकांकिको’च्या निमित्ताने अनेक नावीन्यपूर्ण विषय समोर येतात. काही विषय समकालीन वास्तवाशी जोडलेले असतात, तर काही भूतकाळातील घटनांचा वेध घेणारे, तर काही विषयांतून अप्रतिम कल्पनाविलास साकारला जातो. एकांकिके चे सादरीकरण, नेपथ्य, प्रकाश आणि पर्यायाने दिग्दर्शन याला प्रेक्षकांकडून खुली दाद मिळत असते. परंतु ती एकांकिका लिहिणारा चेहरा मात्र क्वचितच समोर येतो. गेल्या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिको’ या स्पर्धेत राज्यभरातून आठ एकांकिका महाअंतिम फे रीत दाखल झाल्या. त्यापैकी काही निवडक आणि आशयाचे वेगळेपण सिद्ध करणाऱ्या एकांकिकांचा संहितानिर्मितीचा प्रवास जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

पंढरपूरवारीतून उलगडलेली कथा

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
Marathi board mumbai
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर, मुंबई महापालिकेचा निर्णय, १ मे पासून अंमलबजावणी
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

नाटय़संमेलनाच्या निमित्ताने मी पंढरपूरला गेलो होतो, परंतु दर्शन करण्यासाठी म्हणून विठ्ठल मंदिरात गेलो आणि चप्पल चोरीला गेली. संमेलनाला कसे जायचे हाही प्रश्न होता. पण त्याच वेळी हा विषय मनात रेंगाळत राहिला. पुढे पुन्हा आषाढीच्या निमित्ताने पंढरपूरला गेलो आणि तेथील वातावरणात कमाल तफावत जाणवली. लोकांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूटमार मनात सलू लागली. मग पुढे दहा दिवस वारीत फिरून वारीतल्या भक्तांचेही अनुभव जाणून घेतले. आणि तेव्हा मनात आले की एखाद्या गरीब वारकऱ्याची चप्पल चोरीला गेली आणि तो पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेला तर काय? आणि याच सूत्रावर प्रशासन, व्यापारी आणि यांच्या विळख्यात अडकलेला सामान्य वारकरी यांच्यावरची एकांकिका लिहिली गेली. चप्पल हरवण्यापासून ते देव हरवलापर्यंतचा हा तीन वर्षांचा प्रवास होता. याचा शेवट आळंदीत इंद्रायणी काठी लिहिला गेला. महाविद्यालयात ती सादर करणे आव्हान होते, कारण मी लिहिलेला पंढरपुरातील बाजार आणि काही दृश्यं रंगमंचावर कशी उतरतील याबाबत साशंकता होती. परंतु दिग्दर्शकाची कमाल आणि तरुण मुलांची मेहनत यामुळे ‘देव हरवला’ ही एकांकिका लोकप्रिय ठरली.     राहुल बेलापूरकर

सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई, एकांकिका- देव हरवला

अनपेक्षित यश

‘रंगवैखरी’ या शासनाच्या स्पर्धेसाठी गीत-नृत्य-नाटय़ आविष्कार असलेली एकांकिका बसवण्यासाठी काही निवडक लेखक-कवींचे साहित्य निवडायचे होते. त्यादरम्यान अरुण कोलटकर यांची ‘फुगडी’ ही कविता वाचनात आली होती, परंतु या कवितेचे एकांकिके त रूपांतर कसे करावे, हा प्रश्न होता. महाविद्यालयात याआधी एकांकिकेचे फार वारे नसल्याने अनेक अडचणी आल्या. ‘रंगवैखरी’ स्पर्धेत यश मिळाले नाही, परंतु लोकांकिकाच्या निमित्ताने पुन्हा ‘फुगडी’ या एकांकिकेचा प्रवास सुरू झाला. रत्नागिरी विभागातून अनेक मातबर महाविद्यालये या स्पर्धेत उतरत असल्याने दडपण आले होते. परंतु आपण प्रयोग करून पाहू या उद्देशाने लोकांकिकोत ‘फुगडी’ करून पाहायचे ठरवले. संहितेच्या लेखनात काही बदल केले गेले. काही माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेऊ न अजून काही नवीन साकारता येईल यावर विचार केला गेला. आयुष्यात आलेल्या अडचणींवर देवाला दोष देणाऱ्या अंबुचीही कथा एकांकिकेत मांडताना आपण स्पर्धेत टिकू का, असे अनेकदा वाटले. परंतु विभागीय अंतिम फेरीत या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान मिळाला हे यश आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.

– राजेंद्र बोडेकर,

एकांकिका- ‘फु गडी’, एस. एच. केळकर महाविद्यालय, देवगड- रत्नागिरी विभाग.

आरक्षणाच्या चौकटीतून..

गेल्या वर्षी महाराष्ट्रात पेटलेला आरक्षणाचा मुद्दा कुठे तरी जिव्हारी लागला होता. एकीकडे आरक्षण मिळालेला समाज आणि दुसरीकडे आरक्षणाची मागणी करणारा समाज यामध्ये नकळत तेढ निर्माण झाली होती. अगदी मित्रामित्रांमध्येही अशा जातीय चर्चाचे पडसाद उमटले होते. पण हे चित्र अत्यंत विदारक असल्याने हे एकांकिकेतून मांडावे असे वाटले आणि ‘चौकट’ ही एकांकिका लिहिली गेली. इथे कोणत्याच समाजाची बाजू मांडायची नव्हती ना कोणत्या समाजाला चुकीचे ठरवायचे होते, परंतु मग बरोबर काय हेच मांडण्याची ही प्रक्रिया होती. यातले प्रत्येक विचार प्रत्येकाला पटण्यासारखे नसल्याने लिहून झाल्यावर विद्यार्थ्यांसोबतही अनेक चर्चा झाल्या. चर्चेतून विषय समजवून घेतला गेला. ‘आरक्षण मिळावे पण ते माणसा-माणसात फूट पाडून नाही’ हा विचार पोहोचवायचा होता आणि तो पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झाली. या एकांकिकेला अनेक ठिकाणांहून प्रतिप्रश्न केले गेले, परंतु ‘लोकांकिका’त तसे झाले नाही याउलट इथे या विषयाला न्याय मिळाला, असे मला वाटते.

मोहन बनसोडे. ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे,  एकांकिका- चौकट

लेखनाचा पाया भक्कम झाला

गेल्या वर्षी ‘लोकांकिको’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या ‘मादी’ या एकांकिकेची कथा मला जुन्या कथेवरून सुचली. आम्हा मित्रांना लहान असताना आजी गोष्ट सांगत असे. गावात भल्या पहाटे एक बाई प्रातर्विधीकरता जाते. शौचालयाची जागा ही गावाच्या बाहेर असल्याने लहान बाळाला कुठे ठेवायचे हा तिच्यासमोरचा मोठा प्रश्न असतो. ती लहान बाळाला सासऱ्याकडे देते, परंतु अंधारात ती सासरा समजून बाळाला अस्वलाकडे सोपवते. लहानपणी आजी भीती दाखवण्यासाठी ही गोष्ट सांगत असे. परंतु पुढे याचे एकांकिकेत रूपांतर होऊ शकेल का, हा विचार माझ्या मनात काही वर्षे घोळत होता. माणसाची मादी म्हणजे स्त्री सकाळपासून दिवसाचे काम उरकते. यामध्ये प्राणी आणि माणसाच्या मादीचे भावविश्व मांडण्यात आले होते. मादीची कथा फुलवण्यासाठी काही मित्रांची मदत झाली. कोणतीही कथा लिहिताना त्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभे राहाते. ‘लोकांकि का’सारख्या अनेक स्पर्धामध्ये लेखन केल्यामुळे त्याचा आता मालिकेचे संवाद लिहिताना उपयोग होतो. या स्पर्धामुळे लेखनाचा पाया पक्का होण्यास मदत झाली. सध्या मी ‘झी मराठी’वरील ‘वेडिंगची वाइफ लग्नाची बायको’ या मालिकेच्या पटकथालेखनाचे काम करत आहे. या वेळेस मला काही कारणाने स्पर्धेत भाग घेता येणार नाही. परंतु महाअंतिम फेरी पहाण्यास नक्की येणार आहे.

– रावबा गजमल,

‘मादी’, प्रथम क्रमांक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद</p>

लेखनशैलीत जाणीवपूर्वक बदल केला

मी गेल्या वर्षी ‘आशा’ या एकांकिकेचे लेखन केले होते. ‘आशा’ ही एकांकिका एका सत्यकथेवर आधारित असून अरुण कोलटकरांची ‘विपाशा’ या कवितेवरून प्रेरित आहे. एकांकिकेसाठी दिग्दर्शक ऋग्वेद सोमण याचे सहकार्य लाभले. ऋग्वेदने एका कार्यक्रमात ही कविता ऐकली होती. आणि या कथेवर काम करू शकतो यावर सर्व टीमने विचारमंथन करण्यास सुरुवात केली. कथा फुलवण्यासाठी इंटरनेट, पुस्तकांचा आधार घेतला. या एकांकिकेतील संवाद लयबद्ध असल्याने ती शैली आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केला. कथेत काही शिव्या तसेच सामाजिक विषयावर थेट भाष्य करणाऱ्या संवादांचा वापर करण्यात आला. माझी लिखाणाची शैली नसल्याने त्यात जाणीवपूर्वक बदल केला. ‘हायपेशिया’ नावाची स्त्री शास्त्रज्ञ समाजात विज्ञाननिष्ठ विचारांबाबत आग्रही असून ती धर्माच्या विरुद्ध उभी ठाकते. धर्मगुरूला ही बाब मान्य होत नसल्याने तिची हत्या करण्यात येत असल्याचे एकांकिकतेून मांडण्यात आले आहे. या कथेच्या संहिता लेखनासाठी दोन ते तीन आठवडे लागले. रोज मी आणि नाटकाची टीम चर्चा करत होतो. ही कथा कशा अंगाने फुलवता येईल याकडे बारकाईने पाहिले. ही परीक्षकांना आवडेल का याबाबत साशंक होतो, परंतु विज्ञान विचारांवर भाष्य करणाऱ्या या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला. यामुळे मी विविध लेखनशैलीत लिहू लागले. यंदाही मी एकांकिकेचे लेखन केले असून एक महिन्यापासून तालीम जोरात सुरू आहे.

मुक्ता बाम- लेखिका ‘आशा’, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे</p>

संकलन – नीलेश अडसूळ, मानसी जोशी