News Flash

‘पोश्टर गर्ल’चे ‘पुढचं पाऊल’!

‘पोश्टर गर्ल’चा हा विशेष भाग ८ फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे.

‘पोश्टर गर्ल’

आपले ‘उत्पादन’ विकण्याच्या आजच्या जाहिरातीच्या युगात मालिका, नाटक आणि चित्रपट यांचे एकमेकांना सहकार्य मिळाले तर त्या कलाकृतीच्या प्रसिद्धीसाठी त्याचा मोठा उपयोग होतो. जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत ती कलाकृती, त्यातील विषय पोहोचतो. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून रंगभूमीवर येणारी नवी नाटके किंवा आगामी चित्रपटांचा उल्लेख मालिकांमध्ये पाहायला मिळतो. किंवा त्यातील कलाकार मालिकेच्या एखाद्या विशेष भागात पाहायला मिळतात. ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि आगामी ‘पोश्टर गर्ल’ या मराठी चित्रपटाचा चमू एकत्र आले आहेत.

गर्भलिंग निदान, स्त्रीभ्रूण हत्या हे विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे असून शासकीय पातळीवर तसेच स्वयंसेवी संघटनांकडून या विषयावर समाजात जनजागृती करण्यासाठी त्यांच्या स्तरावर प्रयत्न सुरू असतात. आगामी ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटाचा विषय ही ‘स्त्रीभ्रूण हत्या’ असाच आहे. हा विषय गंभीर असला तरी मनोरंजक आणि विनोदाच्या अंगाने तो मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. समजात जनजागृती करण्यासाठी ‘पोश्टर गर्ल’ची प्रसिद्धी ‘स्टार प्रवाह’वरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून केली जाणार आहे.

‘पोश्टर गर्ल’चा हा विशेष भाग ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसात वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 3:10 am

Web Title: loksatta review on poster girls marathi serial
Next Stories
1 राज कपूर यांच्या ‘किसी के मुस्कुराहटों पे’ गाण्याचा रिमेक!
2 कपिल शर्माची नवी ‘कॉमेडी स्टाइल’
3 उदयोन्मुख गायकांसाठी ‘संगीत आणि त्यापलीकडे’चे व्यासपीठ
Just Now!
X