बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच एका मासिकासाठी खास फोटोशूट केले. या फोटोंमध्ये दिशा फारच सुंदर दिसतेय. या फोटोमध्ये दिशाने काळ्या रंगाचा टॉप घातला होता. या काळ्या टॉपमध्ये कूल पोझ देताना ती मनमोहक दिसत होती. या टॉपसोबत दिशाने प्रिंटेड बॉटम घातले होते. हलकासा मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह काढण्यात आलेल्या या फोटोमध्ये ती मादक दिसते.

दिशाने हे फोटोशूट ‘ग्राझिया’ मासिकाच्या कव्हर पेजसाठी केलेले. या फोटोशूटमध्ये तिचे वेगवेगळ्या कपड्यांमध्ये फोटो काढण्यात आले. दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. तरुणांमध्ये दिशा पटानीची असलेली क्रेझ पाहता तिच्या या फोटोंना हजारोंच्याही पुढे लाइक्स आले.

दिशाला इन्स्टाग्रामवर सहा लाख ३० हजार लोक फॉलो करतात. तिने आतापर्यंत इन्स्टाग्रामवर कमीत कमी १३९१ फोटो शेअर केले आहेत. याशिवाय १८ लाखांहून अधिक लोक तिच्या फेसबुक पेजशी जोडले गेले आहेत. दिशा सोशल मीडियावर फार सक्रिय असून व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी ती सतत शेअर करत असते.

ट्विटरवरील तिच्या फॉलोवर्सबद्दल बोलायचे झाले तर ट्विटरवर फक्त दोन लाख ८२ हजार लोक तिला फॉलो करतात. दिशाला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’साठी यंदाचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा आयफा पुरस्कार मिळालेला. याचेही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. ‘कुंग फू पांडा’ या सिनेमात दिशा, जॅकी चॅनसोबत दिसली होती.

‘पतीने दिलेल्या पोटगीवर मजा मार’ कमेन्टवर मलायकाने दिले सडेतड उत्तर