अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीबद्दल अजून बऱ्याच काही धक्कादायक गोष्टी उघड व्हायच्या आहेत, अशी प्रतिक्रिया पत्नी आलिया सिद्दिकीने दिली. नवाजुद्दीनच्या पुतणीने त्याच्या भावाविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर आलियाने ट्विटरवर ही प्रतिक्रिया दिली.
‘ही तर फक्त सुरुवात आहे. माझी साथ दिल्याबद्दल देवा तुझे खूप खूप आभार. अजून बऱ्याच काही धक्कादायक गोष्टी उघड व्हायच्या आहेत. मुकाट्याने सहन करणारी मी एकटीच नाही. पैशाने किती सत्य विकत घेऊ शकतं आणि आणखी कोणाला ते विकत घेतील ते पाहुयात’, असं ट्विट नवाजुद्दीनच्या पत्नीने केलं आहे.
This is just the beginning. Thanking God for sending so much support already.
Lot will be revealed, shocking the world as I am not the only one who suffered in silence.
Let’s see how much of TRUTH money can buy & who all would they continue to BRIBE.https://t.co/15swqg4Tv5
— AaliyaSiddiqui2020 (@ASiddiqui2020) June 2, 2020
नवाजुद्दीनच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मात्र अद्याप नवाजुद्दीनने त्या नोटिशीला उत्तर दिलेलं नाही. आलियाने नवाजुद्दीन व त्याच्या कुटुंबीयांवर शारीरिक व मानसिक छळाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता नवाजुद्दीनच्या पुतणीने त्याच्या भावाविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. अल्पवयीन असताना नवाजुद्दीनच्या भावाने लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिने केली आहे. दिल्लीतील जामिया पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 7:46 pm