31 October 2020

News Flash

सारा-कार्तिकच्या ‘लव्ह आज कल’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये

फक्त केमिस्ट्रीच नाही तर कथाही महत्त्वाची, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून येत आहेत.

कार्तिक आर्यन, सारा अली खान

कार्तिक आर्यन व सारा अली खान यांच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी बऱ्यापैकी कमाई केली आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाने शुक्रवारी १२.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यामुळे आठवड्याअखेर हा चित्रपट दोन अंकी तरी कमाई करेल का असा प्रश्न चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने उपस्थित केला आहे.

सारा-कार्तिकच्या या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार करण्यात आलं होतं. सोशल मीडियावरही त्याची चर्चा होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील कमाईकडे सर्वांचं लक्ष होतं. अनेकांनी कथा गुंतागुंतीची असल्याचं मत व्यक्त केलं. तर काहींना चित्रपटाची कथा रटाळ वाटली. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सारा-कार्तिकच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल याची उत्सुकता चाहत्यांना होती. कलाकारांमधील केमिस्ट्री जरी चांगली असली तरी कथा हा चित्रपटाचा गाभा असतो आणि कथा सक्षम नसेल तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटतो, हे आजवर प्रेक्षकांनी मोठमोठ्या कलाकारांना दाखवून दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ‘लव्ह आज कल’ चित्रपटाचं भवितव्य काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोशल मीडियावर सारा अली खानच्या ‘ओव्हर अॅक्टिंग’चीही खूप चर्चा झाली. त्यामुळे अशा नकारात्मक प्रतिक्रियांचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकता. इम्तियाज अलीचा याआधीचा ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यामुळे ‘लव्ह आज कल’ किती कमाई करतो याकडे अनेकांंचं लक्ष आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 5:31 pm

Web Title: love aaj kal first day box office collection kartik aryan sara ali khan imtiyaz ali ssv 92
Next Stories
1 जंगजौहर : पावनखिंडीचा रणसंग्राम रुपेरी पडद्यावर
2 चिन्मय उदगीरकर-प्रितम कागणेचा रोमॅण्टीक अंदाज
3 लोकनाट्य गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन
Just Now!
X