02 December 2020

News Flash

‘…आणि तिने होकार दिला’; नेहा-रोहनप्रीतची प्यारवाली लव्हस्टोरी

पाहा, नेहा- रोहनप्रीतची भन्नाट लव्हस्टोरी

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांचं लग्न होऊन बरेच दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे नेहाच्या लग्नातील प्रत्येक सोहळा विशेष गाजला. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये नेहा-रोहनची चर्चा सुरुच आहे. यामध्येच सगळ्यांना प्रश्न पडला आहे तो म्हणजे या दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी होती. या दोघांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. त्यामुळेच अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत नेहा- रोहनने त्यांची प्यारवाली लव्हस्टोरी सांगितली आहे.

“आमच्या प्रेमाची सुरुवात झाली ती नेहा दा व्याह या गाण्याच्या शूटपासून. सेटवर बऱ्याच वेळा मी त्याचं निरीक्षण केलं, तो प्रत्येकाशी आदराने आणि नीट वागत-बोलत होता. त्यामुळे मी आतापर्यंत भेटलेल्या सगळ्या मुलांमध्ये मला तो जास्त क्यूट वाटत होता. त्याला पाहिलं की मला कायम असं वाटायचं हा फक्त माझा आहे”, असं नेहा म्हणाली. विशेष म्हणजे नेहाप्रमाणेच रोहनप्रीतनेदेखील त्याच्या प्रेमाची कबुली दिल्याचं त्याने सांगितलं.

आणखी वाचा- नेहा कक्करचा रोका झाला, समोर आला व्हिडीओ

“मला ती सगळ्या मुलींच्या तुलनेत वेगळी वाटली. त्यामुळे एक दिवस हिंमत करुन मी तिच्या समोर गेलो आणि तिला प्रपोज केलं. विशेष म्हणजे तिनेदेखील मला होकार दिला”, असं रोहनप्रीत म्हणाला.

पाहा फोटो >> Made For Each Other! नेहाच्या लग्नातील काही खास क्षण

दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीत यांनी २४ ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली. यंदा २०२० मधील कलाविश्वातील सर्वात गाजलेला विवाहसोहळा म्हणून या दोघांच्या लग्नाकडे पाहिलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:30 pm

Web Title: love at first sight rohanpreet singh opens up about neha kakkar dcp 98 ssj 93
Next Stories
1 Photo : ‘रश्मी रॉकेट’मधील तापसीचा फर्स्ट लूक; साकारतेय अ‍ॅथलिटची भूमिका
2 जर अभिषेक “बच्चन” नसता…, अभिषेकने केले ट्रोलरलाच ट्रोल
3 मोनालिसाचा ‘करंट’ देणारा अंदाज पाहिलात का?
Just Now!
X