News Flash

विनय-आकांक्षाचे होणार शुभमंगल सावधान!!

विनय आणि आकांक्षाच्या लग्नाचा प्रश्न मात्र सुटला आहे.

विनय-आकांक्षाचे होणार शुभमंगल सावधान!!
लव्ह लग्न लोचा

‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेला वर्ष होऊन गेले तरीही या मालिकेचा गोडवा आजही तसाच कायम आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीने ही एक मस्त जमून आलेली मालिका आहे. बारकाईने विचार करून गुंफलेली पटकथा आणि प्रत्येक कलाकाराचा अवाका ओळखून रचलेले प्रसंग आणि कलाकारांनी त्यासाठी घतलेली मेहनत प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा आता अनेकांच्या घरातील एक सदस्य झाला आहे.

PHOTO : ‘रेगे’ फेम आरोह वेलणकरचे हटके प्री-वेडिंग फोटोशूट

मालिकेतील राघव, विनय, अभिमान, शाल्मली, काव्या, आकांक्षा, श्रीकांत आणि आता नवीन आलेले सदस्य पण या ‘लव्ह लग्न लोचा’च्या कुटुंबात पूर्णपणे मुरले. नवीन आलेल्या ऋता आणि राजाच्या अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देत आहेत. यात घडणारे सगळेच लोचे आता सर्वांनाच स्वतःचे असल्यासारखेच वाटत आहेत. मग राघवच नक्की प्रेम कोणावर आहे? काव्या आणि ऋताचा वाद संपणार का? गावावरून आलेला राजा या कुटुंबात एकरूप होईल का? अभिमान आणि शाल्मलीच बाळ नक्की कोणावर जाणार? श्रीकांत खरंच चांगलं वागतोय की नाटक करतोय आणि सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे विनय आणि आकांक्षा यांचे लग्न होणार की नाही ?? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळवून ठेवत आहेत. पण, आता यातील विनय आणि आकांक्षाच्या लग्नाचा प्रश्न मात्र सुटला आहे.

वाचा : विवाहित पुरुषाशी कधीच लग्न करणार नव्हती श्रीदेवी, पण…

सध्या मालिकेत सगळी मंडळी विनय आणि आकांक्षाच्या लग्नाची तयारी करत आहेत. त्यात आता बॅचलर पार्टी होणार आहे, मग त्यात लोचे न होऊन कसे चालेल? विनय आणि आकांक्षाच्या ‘लव्ह’मुळे त्यांच्या लग्नात किती लोचे होतात ते पाहायला नक्कीच मजा येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 1:21 pm

Web Title: love lagn locha serial vinay akanksha getting married
Next Stories
1 …म्हणून सलमानने सुशांतला फटकारले?
2 आलिया भट्टचा नवा ‘कटोरी कट’ पाहिलात का?
3 असभ्य वर्तन करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे – बबिता फोगट
Just Now!
X