27 September 2020

News Flash

Video : कौटुंबिक मनोरंजन करणा-या ‘लव्ह यु जिंदगी’चा टीझर प्रदर्शित

सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.

अभिनेता सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह यु जिंदगी’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार असून अनिरुद्ध दाते असं त्यांच्या भूमिकेचं नाव आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा टीझर म्हणजे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरला असून या टीझरमधून प्रेम जरी जिंदगी वर असलं तरी त्याची परिभाषा ही दोन्ही वयोगटात कशी वेगळी असते हे दाखवण्यात आलं आहे.

सचिन पिळगांवकर, प्रार्थना बेहरे, कविता लाड यांच्या अभिनयाची झलक आणि काही गमतीदार किस्से या टीझरमध्ये पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने एक नवी जोडी म्हणजेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर हे लक्षात येते की सचिन पिळगांवकर साकारत असलेले सामान्य गृहस्थ अनिरुद्ध दाते हे पात्र यांचे वयाच्या बाबतीत फारच वेगळे मत आहे. जसे की ते त्यांच्या वाढत्या वयाच्या सत्याला स्विकारण्यास तयार नसून आपण आजही ते तारुण्य अनुभवू शकतो, त्याच उत्साहाने मनमौजी आयुष्य जगू शकतो असे त्यांना वाटते आणि म्हणूनच पुन्हा एकदा तारुण्य जगण्यासाठी त्यांची असलेली धडपड चित्रपटात पाहायला मिळेल. असा हा विनोदी, भावनात्मक आणि रोमांचकारी कथा असलेला चित्रपट अनेकांच्या नक्की पसंतीस उतरेल हे नक्की.

दिग्दर्शक आणि सिनेनिर्मिते या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की आयुष्यावर प्रेम करण्यासाठी वयोमर्यादा नसते, त्यासाठी गरजेचं असतं ते उत्साही मन आणि आयुष्य भरभरून जगण्यासाठी लागणारं एक गोड धाडस. एस पी प्रोडक्टशन निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केली आहे.विशेष म्हणजे चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या १४ डिसेंबर ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 5:20 pm

Web Title: love you zindagi teaser release
Next Stories
1 लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर प्रदर्शित
2 Detective Pikachu Trailer : पिकाचू झाला हेर !
3 …म्हणून बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन
Just Now!
X