23 February 2019

News Flash

प्रेमप्रकरण की निव्वळ अफवा? निकसोबत डिनर डेटला गेली ‘देसी गर्ल’ प्रियांका

२०१७ पासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण प्रियांकानं मात्र तेव्हा काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली होती.

प्रियांका आणि निक पुन्हा एकदा डिनर डेटसाठी एकत्र जाताना दिसले.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा तथाकथित विदेशी बॉयफ्रेंड निक जोनास यांच्या चर्चा सगळीकडेच सुरू आहेत. प्रियांकानं पूर्वी कधीही आपल्या नात्याविषयी उघडपणे चर्चा केली नव्हती. इतकंच नाही तर काही महिन्यांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचंही तिनं कबुल केलं होतं. त्या व्यक्तीसोबत ब्रेक अप झाल्यानंतर मला खूपच त्रास झाला होता असंही ती म्हणाली होती. पण प्रियांकाच्या आयुष्यातली ती खास व्यक्ती कोण होती हे मात्र कोणालाही कळलं नाही. या मुलाखीतनंतर काहीच दिवसांत प्रियांकाचं नाव अमेरिकन गायक निक जोनासशी जोडलं गेलं. २०१७ पासून दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. पण प्रियांकानं मात्र तेव्हा काहीतरी कारण सांगून वेळ मारून नेली होती. पण आता मात्र निकसोबत चक्क डिनर डेटलाही प्रियांका गेली त्यामुळे त्यांच्यामध्ये नक्की प्रेमप्रकरण सुरूय की या केवळ अफवा आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

निकसोबत बेसबॉल सामना त्यानंतर याँट पार्टी अशा विविध ठिकणी एकत्र हजेरी लावल्यानंतर प्रियांकाने निकच्या कौटुंबिक कार्यक्रमातही नुकतीच हजेरी लावली होती. गेल्याच आठवड्यात त्यांना जेएफके विमानतळावर एकत्र पाहण्यात आलं होतं. या आठवड्यात निकची चुलत बहीण रॅशेल तंबुरेलीच्या लग्नसोहळ्यातही प्रियांका उपस्थित होती. निकच्या नातेवाईकांची प्रियांकाची ही वाढती जवळीक आणि त्यांच्या नात्यात दिवसागणिक येणारी सहजता पाहता त्यांच्या नात्याची चर्चा होती. सोशल मीडियावर या लग्नातले प्रियांका आणि निकचे फोटोही व्हायरल झाले होते. या चर्चा क्षमत नाही तोच प्रियांका आणि निक पुन्हा एकदा डिनर डेटसाठी एकत्र जाताना दिसले त्यामुळे देसी गर्लच्या या तथाकथित विदेशी बॉयफ्रेंडची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

First Published on June 13, 2018 5:08 pm

Web Title: lovebirds priyanka chopra and nick jonas step out for dinner date