News Flash

लकी अली यांच्या निधनाच्या अफवांवर मैत्रिणीने केला खुलासा

करोनामुळे लकी अली यांचे निधन झाल्याचे म्हटले जात होते.

करोना व्हायरसमुळे सध्या अनेकांचा मृत्यू होत आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील देखील अनेक कलाकारांचे निधन झाले. मंगळवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर गायक लकी अली यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. करोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. पण लकी अली यांची मैत्रिण नफीसा अलीने ट्वीट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून लकी अली हे लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यामुळे मंगळवारी करोनामुळे त्यांचे निधन झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक चाहत्यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. ते सर्व पाहून लकी अली यांची मैत्रीण नफीसा अलीने ‘लकी एकदम ठिक आहे आणि आज दुपारीच आमचे बोलणे झाले आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला करोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती ठिक आहे’ असे म्हटले आहे.

दरम्यान, नफीसा अलीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. तेव्हा ती म्हणाली, ‘मी दिवसातून २ ते ३ वेळा लकीशी बोलले. तो ठिक आहे. त्याला करोना झालेला नाही. तो त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टच्या प्लानिंगमध्ये व्यग्र आहे. आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्ट बद्दल देखील बोललो होतो. तो बंगळूरुमध्ये फार्महाऊसवर आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. मी काही वेळा पूर्वीच त्याच्याशी बोलले आणि तो एकदम ठिक आहे’ असे नफीसा म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 10:51 am

Web Title: lucky ali died rumors on social media friend nafisa ali clarifid avb 95
Next Stories
1 फॅशन डिझाइनर्सने कंगनासोबत करार तोडल्यानंतर बहिण रंगोली संतापली; “हे छोटे डिझायनर..”
2 आमिरच्या अफेअरवर प्रश्न विचारताच सलमानने दिलं मजेशीर उत्तर
3 Coronavirus: वडिलांनंतर दीपिका पादूकोणलाही करोनाची लागण
Just Now!
X