01 March 2021

News Flash

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये जाण्यास धोनीचा नकार?

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीसुद्धा धोनी या कार्यक्रमात येणार नसल्याची माहिती

छाया सौजन्य- इंटरनेट

टेलिव्हीजनवरील विनोदी कार्यक्रमांना सध्या ग्रहण लागले आहे असेच म्हणावे लागेल. अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीसोबत घडलेल्या प्रसंगामुळे विनोदवीर कृष्णा अभिषेक अडचणीत आला आहे. तर इथे भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार एम. एस. धोनीनेसुद्धा कपिल शर्माच्या कार्यक्रमात येण्यास नकार दिला आहे. बी टाऊनमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कित्येकदा विनोदी मालिकांच्या काहीशा खटकणाऱ्या स्वरुपामुळे अशा कार्यक्रमांना जाण्यास नकार दिला आहे. त्यातच आता ‘कॅप्टन कूल’चीही भर पडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा बऱ्याच काळापासून एम. एस. धोनीला त्याच्या कार्यक्रमात आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण, ‘माही’ने मात्र ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यापासून नकार दिला आहे.

वाचा: ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये रंगावरुन उडवली अभिनेत्रीची खिल्ली

धोनीच्या जीवनावर बनलेल्या ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीसुद्धा धोनी या कार्यक्रमात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात प्रसिद्धीसाठी ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड’ची टिम कपिलच्या कार्यक्रमात येणार की नाही याबाबत शंकाच आहे. धोनी या चित्रपटाच्या टिममध्ये असेल तरच कपिल त्याच्या कार्यक्रमात या चित्रपटाची प्रसिद्धी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याबाबत अनेकांच्याच नजरा धोनीचा निर्णय काय असेल याकडेच लागून राहिल्या आहेत.

वाचा: .. म्हणून ८ वर्षांनंतर धोनीची ‘ती’ प्रेयसी पुन्हा चर्चेत

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मुख्य भूमिका असणारा ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नीरज पांडेंच्या दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अरुण पांडे आणि फॉक्स स्टुडिओद्वारे करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल बी टाऊनसह क्रिकेट विश्वामध्येही उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 5:52 pm

Web Title: m s dhoni refuses to go to kapil sharma show even for the promotion of his biopic
Next Stories
1 जॉन अब्राहमकडून चाहत्याच्या कानशिलात?
2 अमृता सिंगला अनिल कपूर का घाबरतोय?
3 ते कलाकार आहेत, दहशतवादी नाहीत- सलमान खान
Just Now!
X